सांगली : सांगलीच्या (Sangli News) मिरजेत (Miraj) ठाकरे आणि शिंदें गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले. शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला. या वादातून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या अंगावर धावून धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. 


मिरज शहरातील किल्ला भाग जुना या ठिकाणी असणारी जागा 1989 साली पटवर्धन सरकार यांनी मिरज शहर शिवसेनेला भाडेतत्त्वावर दिली होती. उताऱ्यावर शिवसेना शहर प्रमुख म्हणून नोंद आहे. या उताऱ्याच्या आधारे उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी जागेवर हक्क बजावत पत्र्याचे शेड उभे करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालय उघडण्याचे काम सुरू केले. 


धक्काबुक्की आणि एकामेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार 


यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण रजपूत यांनी या जागेवर हक्क बजावत, पत्र्याचे शेड काढण्यासाठी महापालिका प्रशासनाला तक्रार दिली होती. त्यानुसार अतिक्रमण विरोधी पथकाकडून सदर जागेच्या ठिकाणी धाव घेण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे आणि किरण सिंह रजपूत यांच्यामध्ये धक्काबुक्की आणि एकामेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार घडला. 


दोन्ही गटाने जागेवर हक्का सांगितल्याने महापालिका प्रशासनाची मात्र धावपळ उडाली. गणेशोत्सव काळामध्ये सुद्धा शिवसेना कमानीच्या जागेवरून वाद उफाळून आला होता. आता पुन्हा जागेवरून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे.


इस्लामपूर काँग्रेस कार्यालयाचा सुद्धा वाद!


दुसरीकडे, गेल्यावर्षी  इस्लामपूर शहरातील तहसीलदार कचेरी शेजारी मोक्याच्या ठिकाणी असणारे पक्ष कार्यालयाच्या मालकी हक्कावरून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये वाद पेटला होता. 1999 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काँग्रेस कमिटी कार्यालय राष्ट्रवादीचे पदाधिकारी वापरत आहेत. मात्र, इस्लामपुरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यालयाची जागा ही काँग्रेसची असल्याबाबात चर्चा झाली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या