Sangli News: सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच सांगली (Sangli) जिल्हा कारागृहातून आतापर्यंत 80 कैदी कोल्हापूर मधील कळंबा जेल मध्ये हलवले असल्याची माहिती समोर आली आहे. सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. यामध्ये 20 महिला कैदी आणि 60 पुरुष कैदी यांचा समावेश आहे. आतापर्यंत 80 कैदी कळंबा जेलमध्ये हलवण्यात आले आहेत, यामध्ये मोस्ट मोस्ट वॉन्टेड कैद्यांचा देखील समावेश आहे.


कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन आणखी काही कैद्यांना हलवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय कारागृहातील अन्न धान्य , कागदपत्रे, शास्रात्रे, दारुगोळा सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे. सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 


कृष्णा नदीची पाणीपातळी वाढत आहे. दुसरीकडे सांगलीत पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील कारागृहात देखील काही खाळानंतर पाणी शिरतं त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 80 कैदी कोल्हापूर मधील कळंबा जेल मध्ये हलवण्यात आले आहेत. 45 फूटांच्या आसपास पाणी गेल्यानंतर कारागृहात पाणी जाण्यास सुरूवात होते. 
  
याबाबत सांगली (Sangli) कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी माहिती देताना म्हटलं की, सांगली कारागृहातून 80 कैदी कोल्हापूर मधील कळंबा जेल मध्ये हलवले आहेत.  यामध्ये 20 महिला कैदी आणि 60 पुरुष कैदी आहेत. आणखी काही कैद्यांना  कोल्हापूर मधील कळंबा जेल मध्ये हलवण्याची व्यवस्था सुरू आहे. सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे सज्ज आहे. पुरस्थिती निर्माण झाल्यास आवश्क तो अन्नधान्यसाठा, आणि इतर वस्तुंचा साठा करून ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कारागृहातील संगणक कक्ष, कागदपत्रे सर्व गोष्टी पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.


पंचगंगा नदी धोका पातळीवर, राधानगरी धरण भरले 



दरम्यान, पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने महापुराची भीती वाढली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाण्यची पातळी 43 फूट 2 इंचांवर पोहोचली आहे. राधानगरी धरण सुद्धा 100 टक्के भरलं असून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे भोगावती नदी पात्रात 7 हजार 212 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पावसाची उघडझाप सुरु असली, तरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कायम आहे. जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 


कोल्हापूर, सांगलीला पुन्हा महापुराची धास्ती


पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने कोल्हापूरसांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी काल (25 जुलै) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार तसेच एच. के. पाटील यांची भेट घेतली. महापुराची परिस्थिती उद्भवू नये, या पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी, अशी विनंती सतेज पाटील यांनी निवेदनातून केली.