सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) आटपाडी तालुक्यातील दोन नेत्यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षाच्या दालनात चांगलीच खंडाजंगी झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे संचालक तानाजी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्यात तालुक्यातील राजकीय वादावरून ही खडाजंगी झाली. यामध्ये देशमुख यांनी तानाजी पाटीलने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे.
आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर कारखान्यावरुन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे संचालक तानाजी पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्यात खडाजंगी झाली. संचालक मंडळाची काल दुपारनंतर बैठक होती. या बैठकीसाठी संचालक आले होते. अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कक्षात चर्चा करीत बसले होते. हणमंतराव देशमुख यांनी बँकेच्या ताब्यात असलेला माणगंगा साखर कारखाना संचालक पाटील यांच्याशी सबंधित कंपनीला चालविण्यास देण्याबाबत तक्रार केली आहे. कोणत्या नियमाने कारखाना दिला अशी विचारणा केली आहे. यावरुन संचालक तानाजी पाटील यांनी अध्यक्ष मानसिंग नाईक यांच्या केबीन मध्ये बसलेल्या हणमंतराव देशमुख यांना का माझ्याबद्दल तक्रारी करतो असे म्हणत शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि वादावादी सुरू झाली.
एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रकारही घडला. बँकेचे अध्यक्ष मानसिंग नाईक यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेतून बाहेर पडल्यानंतर हणमंतराव देशमुख यांनी पाटील यांच्याविरुध्द जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
हे ही वाचा :