सांगली : सांगली, मिरज कुपवाड महापालिकेची (Sangli Municipal Corporation) प्रशासकीय सभा चक्क कचरा डेपोवर पार पडली. महापालिकेने कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया केलेल्या कचरा डेपोचे रुपडेच पालटलं आहे. यामुळे महापालिकेने आज याच कचरा डेपोवरच प्रशासकीय सभा घेत स्वच्छतेचा एकप्रकारे संदेश दिला. महानगरपालिकेने गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कचरा डेपो बाबत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सविस्तर घनकचरा प्रकल्प अहवाल तयार केला. यामध्ये आयुक्त सुनील पवार यांनी वर्षानुवर्षे कचऱ्याचा आणि कचरा डेपोमध्ये साठून असलेल्या कचऱ्याचा प्रश्न निकाली काढला. कचरा डेपोमधील कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया केल्याने बेडग रोडवरील कचरा डेपोचे रुपडेच पालटले.
14 एकरवर कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया
घनकचरा प्रकल्पातंर्गत समडोळी रोड व मिरज- बेड रोड कचरा डेपोमधील जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. या निविदेमध्ये दोन्ही डेपोमधील जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकामी पुण्यातील कृष्णा ग्रीन एनव्हायरीन सोल्युशन या कंपनीची नियुक्ती केली. एकूण एकूण 56 एकरवर हा कचरा डेपो असून यातील 14 एकरवर कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला.
बायोसॉईल शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध
बेडग रोड कचरा डेपोमधील 3,13,821.413 क्यूबिक मीटर कचऱ्यावर 100 टक्के कामगिरी पूर्ण करून यातील जागा रिकामी करण्यात आली आहे. तसेच समडोळी रोड कचरा डेपोमध्ये 6,54,181 क्यूबिक मीटर कचऱ्यापैंकी 3,36,170 क्यूबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. उर्वरीत कचऱ्यावर प्रक्रिया करून जागा रिकामी करण्यात येणार आहे. जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून निघणारे बायोसॉईल शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध केले जात आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संजीव ओहोळ, चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृर्ती पाटील ,वैभव साबळे यांची उपस्थिती होती. प्रत्यक्षात जागेवर पाहणी करण्यासाठी पत्रकार सहित सर्व उपस्थित नागरिक ,कर्मचारी अधिकारी प्रकल्पाच्या ठिकाणी उपस्थितीत होते. सर्वांनी प्रकल्पाच्या पाहणी केल्यावर समाधान व्यक्त केले. हा प्रकल्प कार्यरत झल्याने भविष्यात कचऱ्याची कोणती समस्या निर्माण होणार नाही, यावर सर्वांनी एकमत नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या