इस्लामपूर (जि. सांगली ) : सांगलीमधील (Sangli) इस्लामपूर (Islampur) शहरामध्ये एका प्रेमाच्या त्रिकोणाची (Two Girlfriend Fight For One Boyfriend in Islampur sangli) चांगलीच चर्चा रंगली आहे. हा प्रेमाचा त्रिकोण साधासुधा नसून केवळ एका बॉयफ्रेंडसाठी दोन गर्लफ्रेंड थेट महाविद्यालयाच्या दारामध्येच एकमेकांच्या झिंज्या ओढत, एकमेकींना लाथाबुक्क्यांनी तुडवत काॅलेजच्या दारात घडल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली. संबंधित बॉयफ्रेंड हा काॅलेज परिसरात कॉफी शॉप चालवतो आणि या एकाच बॉयफ्रेंडवरून या दोन गर्लफ्रेंड एकमेकीशी भेडल्या. दोघीही वाळवा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावामधील आहेत. मात्र, त्यांचं शिक्षण इस्लामपुरातील एका महाविद्यालयामध्ये सुरू आहे. त्या कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत आहेत. त्यामुळे दोघीही एकाच वर्गात असल्यामुळे त्यांचं एकत्र फिरणं, सोबत येणं-जाणं सुरू होतं.


एका बॉयफ्रेंडमुळे मैत्रीत मिठाचा खडा


मात्र, त्यांच्यात एका बॉयफ्रेंडमुळे मैत्रीत मिठाचा खडा पडला. त्या दोघी मिळून काॅलेज परिसरातील कॉफी शॉपमध्ये जात होत्या. त्या कॉफी शॉपमध्ये जात असतानाच त्यामधील एकीचं त्या कॉफी शॉप चालवणाऱ्या मुलासोबत जुळले आणि दोघांमध्ये भेटीगाठी सुरु झाल्या. आपल्या मैत्रीणीचा प्रेमाचा कार्यक्रम सुरु असल्याची माहिती दुसऱ्या मैत्रीणीला माहित होती.  


एकासाठी दोघीही एकमेकींवर तुटून पडल्या 


दोघांमध्ये प्रेमाचे संबंध सुरु असतानाच काही दिवसांनी पहिल्या मैत्रिणीचा आणि त्या मुलाचा काडीमोड झाला. आणि याच सुवर्णसंधीचा लाभ घेत दुसऱ्या मैत्रिणीने त्याच मुलाबरोबर प्रेमसंबंध जोडले. त्यामुळे पण पहिली मैत्रिणीला दुसरी मैत्रीण त्याला जाऊन चिकटल्याने चांगलाच भडका उडाला. दोघींमध्ये याच कारणावरून वादाची ठिणगी पडली ती हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचली. या दोघींमध्ये नुरा कुस्ती सुरू असताना तो मात्र दोघींना खेळवून निवांत बाजूला राहिला. 


बुधवारी दुपारी दोघींची काॅलेजच्या दारातील कुस्ती पाहून इतरांना गांगरून जाण्याची वेळ आली. दोघींनी एकमेकींच्या झिंज्या ओढत, लाथाबुक्क्यांनी हाण की बडीवचा कार्यक्रम सुरु केला. त्यामुळे ही फाईट पाहून एकीची बहिणही हाणामारीत तुटून पडली. कॉलेजच्या दारातच हाण की बडीवचा कार्यक्रम असल्याने याची माहिती कॉलेजच्या प्राचार्यापर्यंत पोहोचली.


प्राचार्यांनी दोघींच्या हातात दाखला देत घरचा रस्ता दाखवला


त्यांनी ही माहिती तातडीने निर्भया पथकाला दिली. प्राचार्यांनी त्या मुलींच्या पालकांना महाविद्यालयात बोलावून घेतले. त्यावेळी त्या चतुर मुलींनी या संदर्भातील कोणतीच माहिती देण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. मात्र पोलिसांनी टप्प्यात घेताच संपूर्ण नाजूक आणि एक बदाम आणि दोन फुल्या प्रकरणचा उलगडा झाला. त्यामुळे संतापलेल्या प्राचार्यांनी दोघींच्या हातात दाखला देत घरचा रस्ता दाखवला. मात्र, एका बाॅयफ्रेंडसाठी दोन गर्लफ्रेंडची कॉलेजच्या दारात झालेली हाणामारी आणि त्यातून जो काही तमाशा झाला त्याची चर्चा मात्र इस्लामपूर शहरासह सांगलीमध्ये चांगलीच रंगली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या