सांगली : श्री शिवप्रतिष्ठानने बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा बंदचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचाराच्या बाबतीत येत्या काही दिवसात कारवाई झाली नसल्यास तर पुढे निर्णय घेतला जाईल, असे श्री शिवप्रतिष्ठानने म्हटलं आहे. 24 ऑगस्ट रोजी मविआकडून पुकारण्यात आलेला बंद आणि 25 ऑगस्ट रोजी काही परीक्षा असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवप्रतिष्ठानने  24 ऑगस्ट रोजीचा बंद मागे घेण्याचा घेतला निर्णय घेतला आहे. 


बांगलादेशमधील नंगानाच तत्काळ थांबवायला हवा


संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेत शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी बंदची हाक दिली होती. संभाजी भिडे म्हणाले होते की, बांगलादेशमधील नंगानाच तत्काळ थांबवायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे. बांगलादेशमधील हिंदू लोकांचे स्थलांतर अजिबात होता कामा नये. त्यांना बांगलादेशमध्ये सुरक्षा मिळायला हवी. सगळ्या हिंदू राजकारण्यांनी या गोष्टी घडल्यानंतर पेटून उठायला हवं असेही ते म्हणाले.


रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावरुन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली तीच आमची भूमिका असल्याचे भिडे म्हणाले. देशांमध्ये बलात्कार हा किळसवाणा प्रकार झाला आहे. अत्याचार थांबायला हवा. कोणत्याही स्त्रीवर होणारा बलात्कारा म्हणजे मातेवरचा बलात्कार असल्याचे संभाजी भिडे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या