Raj Thackeray : बदलापूरमध्ये (Badlapur School Case) चिमुरड्या शाळकरी मुलींवर झालेल्या घृणास्पद प्रकारानंतर राज्यात (Maharashtra) शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा (School Girls) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळकरी लेकींसह पालक सुद्धा भयभीत झाले आहेत. आज (22 ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अचानक साकोलीमधील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात जाऊन पाहणी केली आणि विद्यार्थिनींशी बातचीत केली.






मुलींना मिळणाऱ्या सोयीची केली चौकशी


राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या विदर्भ दौऱ्यात काल (21 ऑगस्ट) रात्री भंडारा जिल्ह्यातील साकोलीत थांबले होते. आज सकाळी ते गडचिरोलीसाठी निघाले तेव्हा त्यांचा निवास असलेल्या रिसॉर्टपासून काही अंतरावरील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात पोहोचले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थिनीशी काही मिनिटं चर्चा करत वसतिगृहात त्या सुरक्षित आहेत की नाही, त्यांना जेवण आणि इतर सोयी योग्य पद्धतीने मिळत आहेत की नाही याची चौकशी केली.


समस्या असल्यास मनसे कार्यकर्त्यांना संपर्क साधा 






एवढेच नाही, तर काही समस्या असल्यास मनसे कार्यकर्त्यांना संपर्क साधा अशी सूचना करत काही मनसे कार्यकर्त्यांचे नंबरही विद्यार्थिनींना दिले. वसतिगृहातील विद्यार्थिनीही राज ठाकरे अचानक चौकशीसाठी पोहोचल्याचे पाहून चकित झाल्या होत्या.



तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही


दरम्यान, बदलापूर घटनवेर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करताना तोफ डागली होती. राज ठाकरे ट्विट करत म्हणाले की,  मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का? जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या