Sangli Crime : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीतील दोन महिलांसह चौघांना पुणे-बंगळूर महामार्गावरील (Pune-Bengaluru Expressway) आणेवाडी पथकर नाक्यावर अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या (Sangli) स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या (Crime Branch) पथकाने ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून लुटीतील साडे बारा लाख हस्तगत करण्यात आले आहेत.


कसा घातला गंडा?


पुण्यातील व्यापारी मयूर जैन यांना संबंधित टोळीने स्वस्तात सोने देण्याचं आश्वासन दिलं होतं. स्वस्तात सोन मिळेल या अपेक्षेने मयूर जैन सांगलीत आले. टोळीने त्यांना मंगळवारी (20 जून) सांगलीतील फळमार्केट जवळ बोलावले. त्यानुसार मयूर जैन तिथे पोहोचले. अशोक रेड्डी याच्यासह अन्य सहकाऱ्यांच्या टोळीने सोन्याचे बिस्किट दाखवून जैन यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले, मात्र सोने न देता पोलीस आल्याचे सांगत तिथून पोबारा केला. 


स्वस्तात सोने देतो असे सांगून पुण्यातील व्यापारी मयूर जैन यांना 


आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच व्यापारी मयूर जैन यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार नोंद होताच तातडीने सातारा पोलिसांना कळवण्यात आले. संशयित आरोपी पुण्याच्या दिशेने जात असल्याचे सातारा पोलिसांना सांगितले. त्यानुसार भुईंज पोलिसांनी आणेवाडी येथे नाकाबंदी केली. यावेळी जीपमधून जात असलेल्या चौघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता लुटीतील साडेबारा लाख रुपये मिळाले. 


उरलेली रक्कम आणि अन्य आरोपींना पकडण्याचा प्रयत्न


प्रशांत निंबाळकर (वय 48 वर्षे, रा. नांदूर, जि. बुलढाणा), प्रवीण खिराडे (वय 37, रा. खामगाव, जि. बुलढाणा), मानसी शिंदे आणि नम्रता शिंदे (दोघी रा. सारोळा, ता.मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या चौघांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लुटीतील उर्वरीत रक्कम हस्तगत करण्याचे आणि टोळीतील अन्य संशयितांना पकडण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.


सांगलीतील दरोडा 6 कोटींचा


सांगलीत 4 जून रोजी रिलायन्स ज्वेल्सवर भरदिवसा फिल्मीस्टाईल दरोडा पडला होता.या दरोड्यात सहा कोटी 44 लाख 300 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. सांगली-मिरज रोडवर एक झाड तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचाच फायदा घेत दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला होता. दरम्यान या दरोड्यातील चार आरोपींची ओळख पटवण्यात तब्बल 15 दिवसांनी यश आले आहे. सशस्त्र दरोड्यातील चौघांची नावे निष्पन्न झाली आहेत. हे सर्व दरोडेखोर हैदराबाद, बिहार आणि पश्चिम बंगालमधील आहेत.


हेही वाचा


Sangli Crime: सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्स सशस्त्र दरोड्यातील आरोपींची नावे अखेर समोर आली! लवकरच अटक करु, पोलीस अधीक्षकांची माहिती