सांगली : सांगली जिल्ह्यात कुपवाडमधील बामणोलीत अल्पवयीन विद्यार्थीनीच्या आत्महत्येनंतर त्याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुपवाडमधील खासगी शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारून अकरावीत शिकणार्‍या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. त्यानंतर त्याच शाळेतील अकरावीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलाने आज (3 डिसेंबर) बुधवारी सकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला. दोघांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.


24 तासात मुलाची गळफास घेत आत्महत्या


याबाबत माहिती अशी की साक्षी रविंद्र जाधव (वय 17 रा. मिरज) या मुलींने शाळेच्या चौथ्या माळ्यावरून उडी मारण्याचा प्रकार मंगळवारी शाळा सुटल्यानंतर घडला. यावेळी तिचे पालकही शाळेत आले होते. उडी मारल्यानंतर तिला तत्काळ खासगी रूग्णालयात उपचारासाठी शाळा व्यवस्थापनाने पालकांच्या मदतीने दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. याबाबत कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत ठाणा प्रभारी सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितले की, मुलगी शाळा सुटल्यानंतर दप्तर घेउन बसमध्ये गेली होती. याच दरम्यान, तिचे पालक तिच्यासंबंधी शिक्षकांना विचारणा करण्यासाठी शाळेच्या आवारात आले होते. या दरम्यान, तिने बसमधून परत शाळेच्या चौथ्या माळ्यावर जाऊन खाली उडी मारली.


दरम्यान, या घटनेला 24 तास होण्यापूर्वीच प्रथमेश हणंमत पाटील या 17 वर्षीय ( मूळ रा. कवठेमहांकाळ, सध्या सुभाषनगर, मिरज) या मुलांनेही राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा मुलगाही याच शाळेत अकरावी विज्ञान विभागात शिक्षण घेत होता. या दोन्ही अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येमागे समान धागा आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. त्याने राहत असलेल्या भाड्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.


एकाच शाळेतील विद्यार्थ्यांनी एका मागून एक केलेल्या आत्महत्यांच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका नामांकित स्कूल आणि जूनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून पालकांच्या समोरच उडी घेऊन आत्महत्या केल्याचा खळबजानक प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला आहे. मात्र ही आत्महत्या तिने का केली ? हे स्पष्ट झालं नव्हतं. एकाच शाळेतील विद्यार्थ्यांना केलेल्या आत्महत्येच्या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या