सांगली : उत्तर प्रदेशातील कानपूर येथून सांगली जिल्ह्यातील तीन गलाई व्यवसायिक सोनं 16 कोटींचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कानपूर पोलिसांचे विशेष पथक सांगली जिल्ह्यात तळ  ठोकून आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये या घटनेनंतर गलाई व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तब्बल साडेतीन किलो सोनं घेऊन फरार झालेल्या गुन्ह्यामध्ये संपतराव लवटे, महेश मस्के आणि एक अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी कानपूर पोलिसांसह (Kanpur Police) सांगली पोलिस सुद्धा करत आहेत. दरम्यान, आणखी एक उत्तर प्रदेश पोलिसांची टीम दाखल झाली आहे. दोन संशयित तरुणांच्या गावाकडील कुटूंबाची कसून चौकशी सुरु आहे. 


खानापूर आणि पलूस तालुक्यात कसून चौकशी 


दरम्यान हे तिघेजण देश सोडून पळून जाऊन नये, यासाठी त्यांची छायाचित्रे मुंबई आणि लखनौ विमानतळावर देण्यात आली आहेत. नेपाळ सीमेवरही आरोपींविरोधात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कानपूर पोलिसांचे विशेष पथक खानापूर आणि पलूस तालुक्यात कसून चौकशी करत आहे.  दरम्यान कानपूरसारख्या घटनांमुळे गलाई व्यावसायिकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या घटनांचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात विटामधील नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक आणि अध्यक्ष सतीश साळुंखे, स्थानिक अध्यक्ष गणपतराव बुडाले आणि उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल 16 कोटींचे दागिने चोरीला गेल्याने सांगली जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली आहे. 


कानपूर येथील पोलिसांचे विशेष पथक चौकशीसाठी दाखल


सांगली जिल्ह्यातील पलूस आणि खानापूर तालुक्यात उत्तर प्रदेशातील कानपूर येथील पोलिसांचे विशेष पथक चौकशीसाठी दाखल झालं आहे. या पथकात तब्बल वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 11 जणांचा समावेश आहे. या पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे. दुसरीकडे पोलिस सहायुक्तांच्या सूचनेनुसार एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटी नेतृत्व एसीपी सीमा माऊवेता कुमार करत आहेत. 


साडेतीन किलोहून अधिक सोनं घेऊन तिघेही पसार


दरम्यान, या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील कानपूर येथील बेकनगंज सरापी बाजारात संपतराव लवटे हा गलाई व्यवसायिक आहे. जुन्या सोन्याची दागिने वितळवण्यासाठी गेल्या 25 ते 30 वर्षांपासून बेकनगंज आणि परिसरातील सर्व व्यावसायिक आपलं सोनं संपतराव शिवाजी लवटेला देतात. लवटेसह अन्य महेश विलास मस्के आणि अन्य व्यक्ती सोनं गाळणीचे काम करतात. 


शुक्रवारी 1 डिसेंबर पासून त्यांच्याकडे गाळणीसाठी आलेलं साडेतीन किलोहून अधिक सोनं घेऊन हे तिघेही पसार झाले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर कानपूरपासून ते पार सांगलीपर्यंत हा तपास सुरु आहे. संपतराव लवटे याचं कुटुंबं कानपुरात बिरहाण रोड येथील नीलवल्ली गल्लीत भाड्याच्या घरात राहत होतं. त्याचं बेकनगंजमध्ये एस आर गोल्ड टेस्टिंग नावाचे दुकान आहे.  हे दोघेही सध्या फरार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या