सांगली : पुणे पोलिसांकडून दिल्ली आणि पुण्यातील ड्रग्ज कारवाईनंतर सांगलीमध्ये ड्रग्ज प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. कुपवाडमध्ये मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज साठा आल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे पुणे पोलीसांचे पथक सकाळपासून कुपवाड शहरात ठाण मांडून आहे. 


कुपवाड शहरामध्ये पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याने एकाच खळबळ


कुपवाड एमआयडीसी पोलीस आणि पुणे पोलिसांच्या पथकाकडून कुपवाडमधील स्वामी मळा,बाळकृष्ण नगर आणि दत्तनगर या ठिकाणी चौकशी करण्यात येत आहे. मात्र, चौकशीच्या बाबतीत पुणे पोलिसांकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे. काही ठिकाणी ड्रग्जशी संबंधित साठा सापडल्याची माहिती समोर आली असून नार्कोटेक्स विभागाच्या पथकाकडून साठ्याचा पंचनामा करण्यांत येत आहे. तपासणीनंतर स्पष्टता होणार आहे. मात्र, सकाळपासून कुपवाड शहरामध्ये पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याने एकाच खळबळ उडाली आहे.


पुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई


दरम्यान, पुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई मागील दोन दिवसांत झाली आहे. दोन दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखेकडून वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्रांतवाडीतील भैरवनगरमधील गोदामातून 55 किलो ड्रग्ज जप्त केला. दौंडमधील कुरकुंब एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर छापेमारीत करत पोलिसांनी 600 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले. 


वैभव माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले आहेत. तेव्हापासून या दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली. ड्रग्स साठा पोलिसांच्या हाती लागेल म्हणून हैदरने शक्कल लढवली आणि हैदरने ड्रग्ससाठा मीठाच्या पाकिटात पुण्यातील विश्रांतवाडी भागात लपवला होता. 


 पुणे पोलिसांच्या कोणत्या कारवाईत किती ड्रग्ज जप्त करण्यात आले?



  • दिल्लीत 600 किलो एम डी ड्रग्ज जप्त, दुसऱ्या कारवाईत 1200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

  • तीन 4 हजार कोटी रुपयांचे 2 हजार किलो एम डी ड्रग्ज जप्त 

  • पुणे पोलिसांकडून पुणे, कुरकुंभसह दिल्लीत छापेमारी

  • सोमवार पेठेतील छापेमारीमध्ये 2 किलो जप्त 

  • विश्रांतवाडी येथील गोदामातून 100 कोटीपेक्षा अधिक किंमतीचे 55 किलो ड्रग्ज जप्त

  • कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कारखान्यात 1100 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त 

  • दिल्लीत 800 कोटी रुपयांचे 400 किलो एमडी ड्रग्ज जप्त 

  • आणखी एका कारवाईमध्ये दिल्लीत 1200 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 600 किलो ड्रग्ज जप्त 


इतर महत्वाच्या बातम्या