सांगली : सांगलीच्या चांदोली धरण (Sangli Chandoli Dam)  परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. ढगफुटीसदृश्य पावसामुळे चांदोली धरणात 26.81  टीएमसी इतका पाणीसाठा झालाय. चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास धरणातून विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. 


चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये 148 मिलिमीटर पाऊस पडला आहे. चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून धरणात 27 हजार 557 क्युसेक पाण्याची आवक सुरूच आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 1625 मिलिमीटर इतका पाऊस पडलाय. त्यामुळे चांदोली धरणात 26.81 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण आता 78 टक्के भरले आहे. चांदोली धरणातून सध्या 1 हजार 995 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास धरणातून विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. 


अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ


दरम्यान  वारणा धरणातून येत्या चौवीस तासात वक्र दरवाजातून केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते.  त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर  नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण व्यवस्थापनकडून देण्यात आलाय.  वारणा धरणाच्या पाणलोट  क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ  होत आहे. 


वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


वारणा नदीकाठच्या गावांना वारणा धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून केव्हाही विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार असल्याने  नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी हलवावीत. कोणत्याही परिस्थितीत नदी, नाले, ओढ्यात प्रवेश करु नये आणि पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  


सांगलीच्या शिराळा आणि  वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस


सांगलीच्या शिराळा आणि  वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील धरणे भरली आहेत. दुसरीकडे वाळवा तालुक्याच्या रेठरे धरण तलावा जवळचा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.या भागातील ओढे नाले देखील तुडूंब भरून वाहू लागलेत. यामुळे अनेक शेतामध्ये पाणी देखील शिरले 


  Video : चांदोली धरण परिसरात 24 तासात 148 मिलिमीटर इतका ढगफुटीसदृश्य पाऊस,



हे ही वाचा :


Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी इशाऱ्यावरून धोका पातळीकडे; कोल्हापुरात पावसाने उघडीप दिल्याने दिलासा