सांगली : जिल्ह्यात आज माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti)  यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (swabhimani shetkari sanghatana)  ऊस दर मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangli News)  वेगवेगळ्या मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन  ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ऊस उत्पादकांना मागील हंगामातील 400 रुपये आणि चालू हंगामात 3500 रुपये दर कारखान्यांनी जाहीर करावा अशी मागणी केली आहे.  गेल्या महिन्याभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहेत.


दिवाळीच्या काळातसुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वेगवेगळ्या कारखान्यासमोर आपल्या ऊस दर मागणीची आंदोलन करण्यात आलं होतं. अनेक कारखान्यांची वाहन ऊस तोडी स्वाभिमानी कडून रोखण्यात आल्या होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासनाने सुद्धा कारखानदार आणि संघटना यांच्यामध्ये बैठक लावून समेट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यामध्येही काही मार्ग निघाला नाही. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली असून आज दिवसभर सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी स्वाभिमानी कडून चक्काजाम आंदोलन केली जाणार आहेत. या चक्काजाम आंदोलनापासून स्वाभिमानीचे ऊस दर आंदोलन अधिक भडकण्याची शक्यता असून जोपर्यंत स्वाभिमानी संघटनेच्या मागणीनुसार ऊस दर जाहीर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


दिवाळी संपली तरी तोडगा निघाला नाही


गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात ऊस आंदोलन सुरु आहे. कोल्हापुरातच नाही तर सांगलीतही ऊस प्रश्न पेटलाय. जो पर्यंत ऊस दराचा तोडगा निघत नाही, तोपर्यंत सांगली दत्त इंडिया कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दिवाळी आधी सुरु झालेल्या आंदोलनावर आता दिवाळी संपली तरी तोडगा निघाला नाही. त्यामुळे अज्ञातांकडून शेतकऱ्यांच्या ऊसाची राख रांगोळी होण्याआधी यावर तोडगा निघणं गरजेचं आहे. सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. आज दिवसभर सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी स्वाभिमानी कडून चक्काजाम आंदोलन केली जाणार आहेत. 


हे ही वाचा :


सरसकटला विरोधच, मराठा उमेदवारांना मतदान नाहीच, सरकारलाही खाली खेचू; प्रकाश शेंडगेंचा इशारा