सांगली: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह (Amit Shah) हे मुंबईत आल्यानंतर अनेक दिवसांपासून रखडलेल्या महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम होण्याची शक्यता आहे. भाजपने राज्यातील 32 जागांवर दावा (Maharashtra BJP Candidate List)  केला असून त्याचे उमेदवारही अंतिम केल्याची माहिती आहे. अशातच भाजप आता महाविकास आघाडीला पहिला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. सांगलीतून भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांचा पत्ता कट होणार असून काँग्रेसच्या विशाल पाटील (Vishal Patil) यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे.


विशाल पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होणार?


भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर त्यांच्याच पक्षातील आमदार आणि भाजप नेते देखील नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भाजपकडून सांगलीतील उमेदवार बदलाच्या चर्चा आहेत. अशातच भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. त्यामध्ये सांगलीतील संजयकाका पाटील यांच्या ऐवजी काँग्रेसच्या विशाल पाटलांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने सुरू केल्याचं दिसतंय.


गेल्या वेळी विशाल पाटलांचा पराभव


गेल्या वेळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विशाल पाटलांना स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून विशाल पाटलांनी पुन्हा एकदा चांगली तयारी सुरू केली. 


सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा दावा? 


कोल्हापूरची शिवसेना ठाकरे गटाची जागा काँग्रेसने आपल्याकडे घ्यावी आणि त्या ठिकाणी शाहू महाराजांना उमेदवारी द्यावी, त्या बदल्यात ठाकरे गटाला सांगलीतील जागा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळेही विशाल पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती. याचा फायदा आता भाजप घेण्याच्या तयारीत असून त्यांनी विशाल पाटलांनाच आपल्या पक्षात घेण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. 


सांगली लोकसभेची रचना कशी?


सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये जत, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव, मिरज आणि सांगली. यापैकी सांगली आणि मिरजेचे प्रतिनिधीत्व भाजपकडे तर पलूस-कडेगाव आणि जतचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आणि खासदारचा गड मानला जाणारा तासगाव राष्ट्रवादीकडे अशी स्थिती आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडे खानापूर-आटपाडीचा मतदारसंघ आहे. 


दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदाराची ताकद देखील जास्त आहे. यामध्ये कडेगावमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, जतचे काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, तासगावच्या शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई पाटील यांचा समावेश आहे.


सांगली लोकसभेला 2019 मध्ये झालेले मतदान



  • संजयकाका पाटील, भाजप- 5 लाख 8,995

  • विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना- 3 लाख 44,643

  • गोपीचंद पडळकर, बहुजन वंचित आघाडी- 3 लाख 234


ही बातमी वाचा: