Sangli Latest Marathi News Update : उत्तर भारतात सफर करण्यासाठी प्रवाशांना आणखी एक तयार झाला आहे. उद्यापासून (6 ऑगस्ट) मिरज ते निजामुद्दीन (दिल्ली) सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस सुरू होत आहे. यामुळे मिरजेतून उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना आणखी एक रेल्वे उपलब्ध झाली आहे. यामुळे सांगलीसह (Sangli Latest News) कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. राजधानी एक्स्प्रेसचा दर्जा असलेली नवीन सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस केवळ 25 तासात दिल्लीत पोहोचत असल्याने प्रवाशांनी सोय होणार आहे.
असा असेल प्रवास
पुणे ते हजरत निजामुद्दीन (क्र.12493/94) या साप्ताहिक दर्शन एक्स्प्रेसचा विस्तार मिरजेपर्यंत करण्यात आला आहे. दर्शन एक्स्प्रेस मिरजेतून दर रविवारी पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. ही एक्स्प्रेस पुण्यात सकाळी 11 वाजता, लोणावळ्यात दुपारी 12 वाजून 5 वाजता, कल्याण येथे दुपारी 01:25 वाजता, वसई रोड येथे दुपारी 2:25 वाजता, वापी येथे दुपारी 3:05 वाजता, सुरत येथे दुपारी 4: 55 वाजता, वडोदरा येथे सायंकाळी 6:38 वाजता, रतलाममध्ये रात्री 10 वाजता, कोटा येथे मध्यरात्री 1:05 वाजता पोहोचेल. त्यानंतर निजामुद्दीन स्थानकात सोमवारी सकाळी 06:45 वाजता पोहोचेल.
परतीचा प्रवास कसा असणार?
परतीच्या प्रवासासाठी प्रत्येक शुक्रवारी रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी निजामुद्दीन येथून सुटेल. त्यानंतर मिरजेमध्ये रविवारी रात्री मध्यरात्री 1 वाजता पोहोचेल.
आणखी गाड्यांचा विस्तार होणार?
पुणे ते मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने पुण्यातील आणखी काही एक्स्प्रेस गाड्यांचा मिरजेपर्यंत विस्तार होणार आहे. या साप्ताहिक एक्स्प्रेसमुळे मिरजेतून दिल्लीला जाण्यासाठी दैनंदिन गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस, आठवड्यातून चार दिवस संपर्क क्रांती एक्स्प्रेस, साप्ताहिक कोल्हापूर- निजामुद्दीन, म्हैसूर-निजामुद्दीन यासह दर्शन एक्स्प्रेसची सोय झाली आहे.
कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामाचे उद्या भूमिपूजन
दरम्यान, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी 43 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या योजनेतील देशभरातील कामांचे भूमिपूजन उद्या रविवारी (6 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अमृत भारत विकास योजनेतून पुणे विभागातील कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, कराड, सातारा, वाठार, लोणंद, तळेगाव, देहू रोड, आकुर्डी, चिंचवड, हडपसर, उरुळी, कडगाव, बारामती आणि फलटण या स्थानकांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या