Sambhaji Bhide : सांगलीत (Sangli) श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीच्या सांगता कार्यक्रमाप्रसंगी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी मार्गदर्शन करताना पाकिस्तानला (Pakistan) संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही, असे वक्तव्य केले आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्य आता चांगलेच चर्चेत आले आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे? (Sambhaji Bhide)

संभाजी भिडे म्हणाले की, "पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही. हिंदुस्थान टिकवायचा असेल तर आज शत्रूला संपवलं पाहिजे, पण आज आपला शत्रू कोण? परका कोण? हेच न कळणारा मूर्ख समाज आहे", असे त्यांनी म्हटले आहे. 

दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा : संभाजी भिडे (Sambhaji Bhide on Dandiya)

दरम्यान, याआधी दुर्गामाता दौड कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी नवरात्रीतील (Navratri 2025) दांडिया (Dandiya) खेळावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा असल्याचे म्हटले होते. यासोबतच त्यांनी भारतातील लोकांना निर्लज्ज असे संबोधून भारतीय संविधानावरही टीका केली होती. संभाजी भिडे म्हणाले होते की, “आपल्याला फक्त स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नको, तर हिंदवी स्वराज्य हवे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी विस्कटलेल्या नवरात्रीचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली होती. त्याच प्रेरणेने आम्ही दुर्गामाता दौड घेतो. आपण गणपती व नवरात्र उत्सव साजरे करताना दांडियासारख्या फालतू गोष्टी करून या सणांचे विकृतीकरण केले आहे. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. 

Continues below advertisement

हा निर्लज्ज लोकांचा देश : संभाजी भिडे (Sambhaji Bhide)

“आपली लायकी काय आहे ते त्या संविधानात लिहिलंय. आणि लोक ते वाचतातही पोटात मुरड आल्यासारखे. काय संविधान, कसले संविधान? भारत हा 1300 वर्षे मुस्लिम व युरोपियनांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा देश आहे. ज्यांना लाज वाटत नाही, ज्यांना पारतंत्र्याची, गुलामीची लाज वाटत नाही त्या लोकांचा हा निर्लज्ज देश आहे," असे देखील संभाजी भिडे यांनी म्हटले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Gopichand Padalkar: देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी माझे कान पकडू देत, तो त्यांचा अधिकार पण...; गोपीचंद पडळकरांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचलं

Uddhav Thackeray: तुमच्याच पत्रावर माझं नाव टाकून देतो, शेतकऱ्यांना मदत करा; ओला दुष्काळ शब्द नाही म्हणणाऱ्या सीएम फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच पत्राची आठवून करून दिली