Sadabhau Khot on Jayant Patil : राजारामबापू पाटील यांनी अनेक माणसे उभे केली. परंतु त्यांनी जी माणसे उभी केली आहेत, त्यांचे साखर कारखाने घ्यायला जयंत पाटील निघाल्याची टीका भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. जयंत पाटलांनी जिल्ह्यातील अनेक कारखाने हाणले असे म्हणत सदभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. संभाजी पवार यांचा कारखाना हाणला, तुम्हाला त्यांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही असे खोत म्हणाले.
खंडे नवमीला हत्यारांचे पूजन होते. परंतु आता ही हत्यारे आम्ही हातात घेणार आहोत असे मत भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढला. पण त्यामध्ये संस्कृतीवंत कलावंत होते, अब्रूवंत होते असे खोत म्हणाले. तसेच यावेळी खोतांनी जयंत पाटलांवरही जोरदार टीका केली. इस्लामपूरमध्ये आम्ही कृषी महाविद्यालय आण्याचा प्रयत्न केला, ते रद्द करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला
दिलीप पाटील यांनी मला व माझ्या आईला शिव्या दिल्या
महाराष्ट्र संस्कृतीमध्ये मला शिव्या घातल्या. दिलीप पाटील यांनी मला व माझ्या आईला शिव्या दिल्या. तेव्हा माझ्या बापान 12 नांगराचा काळ काढला होता असे खोत म्हणाले. प्रस्थापितांचे वारं पाडायला देवा भाऊ यांचा जन्म झाला आहे. सदाभाऊ खोत मंत्री झालेलं, आमदार झालेलं यांना चालत नाही, दिलीप पाटील म्हणतात याला आयता ससा घावला. माढा विधानसभा लढवली तेव्हा माझ्यासारख्या फाटक्या माणसाला पाच लाख मते मिळाली. तुम्ही कधी जिल्हा परिषदेला उभा राहिला आहेत का? असा सवाल करत सदाभाऊ खोत यांची दिलीप पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
आमच्या वाट्याला गेला तर आम्ही तुमचं वार उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही
बावची फाट्यावर जयंत पाटील यांच्या गुंडाने मला मारलं. तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं नाही का? तेव्हा संस्कृती कुठे गेले होती? असा सवाल खोतांनी केला. मला मारलं तेव्हा माझी आई तीन तास राष्ट्रीय महामार्गावर बसून होती. तेव्हाही माझ्या आईने कधी चुकीचं बोललं नाही. माझ्या लेकरांना रक्त सांडलं असं ते म्हणाले. माझ्या आईला तुम्ही सभेतून शिव्या देता. तुम्ही आमच्या वाट्याला गेला तर आम्ही तुमचं वार उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खोतांनी दिला. जिल्हा बँकेच्या नोकर भरती मध्ये दिलीप पाटील यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे, त्यावर प्रशासक नेमा असेही खोत म्हणाले.
राष्ट्रवादी हा पक्ष नाही, तर तो लुटारची आणि गुंडांची टोळी
एका व्यक्तीने जिल्हा बँकेचा घोटाळा बाहेर काढला तर त्याच्यावर 50 कोटी नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची आता चौकशी झाली पाहिजे. राष्ट्रवादी हा पक्ष नाही, तर तो लुटारची आणि गुंडांची टोळी आहे अशी टीका खोतांनी केली. मी उगाच आमदार झालो नाही, बारामतीला पाणी पाजून आलोय. देवा भाऊ हा प्रस्थापितांचा कर्दनकाळ आहे, निष्कलंक मुख्यमंत्री या राज्याला मिळाला आहे. पण त्यांचं आडनाव फडणीस आहे इथेच प्रॉब्लेम आहे. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, तुम्ही नेहमी गाववाड्यातील लोकांना पायाखाली ठेवलं. म्हणून आम्ही जन्माला आलो आहोत. आमचं रक्त सांडलं तरी ज्या पक्षात जन्माला आलो ते पक्ष सौभाग्याचं लेणं असेल असेही खोत यावेळी म्हणाले.