Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: विरोधकांकडून मागणी होत असताना 'ओला दुष्काळ' ही संज्ञा नाही, असे म्हणणाऱ्या सरकारवर टीका करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray criticism on CM Devendra Fadnavis) सीएम देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये विरोधी पक्षनेते असताना लिहिलेल्या पत्राचा (Devendra Fadnavis 2020 letter Ola Dushkal) दाखला दिला. ठाकरे म्हणाले, "त्यांच्या (देवेंद्र फडणवीस) पत्रातल्या चार ओळी मी वाचतो, 'ओला दुष्काळ (Uddhav Thackeray on Ola Dushkal term) जाहीर करून, मदत दिली गेली पाहिजे' त्यावेळेला संज्ञा होती आणि मग तुमची संज्ञा काढली का?" अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना केली. 

Continues below advertisement

बिहार आणि महाराष्ट्रात भेदभावाचा आरोप (Bihar Maharashtra discrimination aid) 

उद्धव ठाकरे म्हणाले की, बिहारमध्ये निवडणुकीमुळे महिलांना 10 हजार रुपये दिले जातात, पण महाराष्ट्रात संकट असताना मदत दिली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून तिकडं लक्ष आहे आणि महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला तयार नाहीत हा अन्याय आहे. महाराष्ट्र भोळा भाबडा म्हणून तुम्ही त्याच्यावर वेडावाकडा अन्याय करू नका, असेही ते म्हणाले.

सरकारच्या मदतीतील दिरंगाईवरून हल्लाबोल (Farmer aid delay Maharashtra politics) 

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री त्यांच्या जाहिरातीमध्ये व्यस्त आहेत, दुसरे मुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावरती सुद्धा स्वतःचे फोटो छापून वाटण्यामध्ये मग्न आहेत आणि तिसरे उपमुख्यमंत्र्यांकडून जनतेला मदत करणं तर दूरच राहिलं. उद्धव ठाकरे यांनी आरोप केला की भाजपमध्ये गेलेल्या साखर सम्राटांच्या शेकडो कोटी रुपयांच्या कर्जाची हमी सरकार घेते, पण गोरगरीब शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी सरकार घेत नाही. ते म्हणाले, "जर का साखर सम्राट भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल... तर ह्यांनी (शेतकऱ्यांनी) सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजप प्रणित सरकार बघतय का?"

Continues below advertisement

शेतकऱ्यांकडूनच मदतीसाठी पैसे कपात (BJP sugar barons loan guarantee controversy) 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडूनच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन 15 रुपये कपात करण्याच्या निर्णयावर त्यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "खड्ड्यात गेलेले शेतकरी त्याला आणखी खड्ड्यात घातलं तर त्याच्यात गैर काय अशी या सरकारची धारणा झालेली आहे". ठाकरे यांनी सरकारकडे स्पष्ट मागणी केली की, "शेतकऱ्याला तातडीने हेक्टरी 50 हजार रुपये दिले गेले पाहिजेत आणि त्याच कर्ज माफ झालं पाहिजे." पंचनाम्यांची वाट न बघता सरकारने ही मदत तत्काळ जाहीर करावी. "पंचनामे कसले करताय? डोळ्या देखत दिसतय शेतकरी रडतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, पीक पाण्यात सडून गेले, आता काय हालत झाली असेल" असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या