सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji bhide) यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. सोमवारी रात्री संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री साधारण 11 वाजता ते हा कार्यक्रम संपवून घराबाहेर पडले. त्यावेळी, माळी गल्ली परिसरातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला (Dog Attack) चढवला. त्यामध्ये, त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले आहेत. मात्र, सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. भिडे गुरुजींचे निकटवर्तीय अनुयायी हणमंत पवार यांची याबाबत माहिती दिली. 

Continues below advertisement

संभाजी भिडे गुरूजींची प्रकृती उत्तम आहे,  कुत्र्याने चावा घेतल्यानंतर प्राथमिक उपचार करून भिडे गुरुजींना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. त्यामुळे, ते ठणठणीत असल्याची माहिती हणमंत पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दुसरीकडे सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी देखील या घटनेनंतर संभाजी भिडे यांची भेट घेऊन तब्येतची विचारपूस केली. तसेच, त्यांच्यासोबत संवाद साधला. या दोघांच्या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. दरम्यान, येथील एका भटक्या कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाला कडकडून चावा घेतला. त्यानंतर संभाजी भिडे यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

महापालिकेनं हाती घेतली मोहिम

दरम्यान, या घटनेनंतर सांगली महापालिकेनेही भटक्या कुत्र्यांसंदर्भात कारवाईची माोहिम हाती घेतली असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं आहे. सांगली महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून भटके कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत पायाचा चावा घेतला. सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला. त्या माळी गल्लीत प्रामुख्याने कुत्र्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

संभाजी भिडे दुर्गामाता दौड आणि किल्ल्यांवरील उपक्रम  राबवतात

संभाजी भिडे यांचं वय सध्या 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. ते सध्या सांगलीत वास्तव्याला असतात. 1980 च्या आसपास भिडे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली होती. सांगली, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटकचा काही भाग, कोल्हापूर या भागात या संघटनेचे काम चालते. संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांची  दुर्गामाता दौड आणि गड-किल्ल्यांवरील उपक्रम अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. 

हेही वाचा

आधी म्हणाले, अंबादास काड्या करतो, आता वाद मिटला; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खैरेंनी पुढचा प्लॅन सांगितला