Banknote Demonetisation : कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटांचे (Demonetisation) करायचे काय? असा प्रश्न सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राज्यातील आठ जिल्हा बँकेच्या प्रशासनासमोर पडला आहे. कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह 8 जिल्हा बँकेत 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नोटबंदीनंतर अजूनही पडून आहेत. या नोटांचे काय करायचे? असा प्रश्न जिल्हा बँकांना पडला आहे. 


500 आणि 1 हजार रुपयांच्या या नोटा नोटाबंदीनंतर हद्दपार झाल्या खऱ्या, पण राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधी रुपयांच्या या नोटा अजूनही पडून आहेत. सांगलीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जुन्या नोटांच्या या 500 रुपयांच्या नोटांची थप्पी लागली आहे. नोटाबंदीनंतर गेली पाच वर्षे महाराष्ट्रभरातील 8 जिल्हा बँकांत जवळपास 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. बँकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असली, तरी अद्याप त्यावर काहीच निर्णय न झाल्याने या बँकांना वर्षाला कोट्यवधींचा फटका बसत आहे. दुसरीकडे त्या नोटांची काळजी घेण्याची जबाबदारी देखील बँकांना खर्च करावा लागत आहे. 


राज्यातील सात जिल्हा बँकांमध्ये पडून असलेली रक्कम (कोटींमध्ये रक्कम)



  • पुणे 22.25 

  • सांगली 14.72

  • वर्धा 0.79

  • नागपूर 5.03

  • अहमदनगर 11.60

  • कोल्हापूर 25.28

  • नाशिक 21.32


8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1 हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या 5 दिवसांत जिल्हा बँकांमध्ये, तर 30 डिसेंबर 2016 पर्यंत पोस्ट ऑफिस आणि अन्य बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही कार्यालयात स्वीकारल्या जातील, असे अर्थ मंत्रालयाने आदेशात म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात आरबीआयने नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर या बँकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. बहुतेक जिल्हा बँका या अडचणीत आहेत. त्यांना तातडीने पैशांची गरज आहे. पैसे पडून असल्याने बँकांना फटका बसत आहे. कोट्यवधींची रक्कम पडून असल्याने त्याच्या व्याजापासून देखील बँकांना मुकावे लागत आहे. त्यामुळे या नोटा लवकर बदलून मिळले तर बँकेचे अर्थचक्र सुरळीत लागायला मदत होणार आहे.


नोटबंदी लागून सहा वर्षे होऊन गेली मात्र अजूनही या जुन्या नोटांचे खोगडे भिजत पडले आहे. त्यामुळे सकारात्मक निर्णय झाल्यास या बँकांचे अर्थचक्र या कोट्यवधी रुपयाच्या नोटांमुळे रुळावर यायला मदत होईल.


इतर महत्वाच्या बातम्या