सांगली : कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्याला लस भेटली आणि म्हणून आपण जिवंत राहू शकलो. 100 देश सांगतात की मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीमधील कडेगावमध्ये सभा झाली. संजयकाकाना दिलेलं मत हे मोदींना दिलेलं मत असल्याचे ते म्हणाले. मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर काँग्रेसने काय केले, पण बॉम्बस्फोट झाल्यावर मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करत दशहतवाद मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, आता दहशतवादी हल्ले बंद झाले आहेत. चीन देखील आता भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नसल्याचे ते म्हणाले. 


कोण देशाचा विचार करेल, देश पुढे नेऊ शकेल याची निवडणूक


फडणवीस म्हणाले की, देशाच्या लोकसभेची ही निवडणूक असून कोण देशाचा विचार करेल, देश पुढे नेऊ शकेल याची निवडणूक आहे. या निवडणुकीत दोन तीन उमेदवार आहेत. यामध्ये आपल्याला एकच उमेदवार नरेंद मोदींचे, तर दुसरीकडे राहुल गांधींचे उमेदवार आहेत. राहुल गांधी यांच्या इंजिनमधील बोगीमध्ये सोनिया गांधी, प्रियांका गांधी बसू शकतात. शरद पवार यांच्या बोगीमध्ये सुप्रिया सुळे बसू शकतात. उद्धव ठाकरेंच्या बोगीत फक्त आदित्य ठाकरेंच बसू शकतात. सर्वसामान्यांना त्यामध्ये प्रवेश नाही. 


साखर कारखानदारी वाचवली


ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री झाल्यावर फक्त विदर्भला जास्त पैसा जाईल असा आरोप करण्यात आला, पण मी मुख्यमंत्री असताना पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक योजनांना सर्वाधिक निधी देत योजना पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी सिंचन योजनेला नरेंद्र मोदी यांनी निधी दिल्याने आज दुष्काळी भागात पाणी आले आहे. ते पुढे म्हणाले की, अनेक लोकांनी राज्य केले सत्ता भोगली, पण आपल्याला फक्त चॉकलेट दिले. मोदींनी ऊसातील आणि साखर कारखानादारीतील काय कळते ,हा प्रश्न उपस्थित केला, पण त्यांच्या कारकिर्दीत काय केले हे विचारले पाहिजे.  मोदींनी साखर कारखान्याना वेगवेगळ्या माध्यमातून मोठी मदत करून साखर कारखानदारी वाचवली. 


नरेंद्र मोदींनी देश आर्थिक मजबूत केला


त्यांनी सांगितले की,  80 लाख आज बचत गट तयार करून महिलांना स्वतःच्या पायावर उभा केले. दिव्यांगासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही भरीव काम करत असून त्यांना प्रवाहात आणायचं काम सुरु आहे. जगात 5 देश दिवाळखोरीत जाणार होते, ज्यामध्ये भारत देश देखील जाणार असे सांगितले होते. मात्र, नरेंद्र मोदींनी देश आर्थिक मजबूत केला, व्यवस्थेमधील भ्रष्टाचार कमी केला. 2013 मध्ये वर्षाला 1 लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होत होते. मोदी यांच्या काळात 13 लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरवर केले जात आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या