Sangli Ganesh 2022 : खानापूर तालुक्यातील नागनाथगगरच्या चिंतामणी गणेश मंडळाने दरवर्षी गणपती निमित्त नाविन्यपूर्ण गणरायाची मूर्ती बनवण्याचा उपक्रम सुरुच ठेवला आहे. यंदा या मंडळाने सहा फुटाच्या गणेश मूर्तीची 1,21,111 आरश्यांच्या मन्यापासून सजावट करून मूर्ती घडवली आहे. 


बाप्पाची आगळी वेगळी सजावट आणि सामाजिक संदेश देणारी सजावट करणाऱ्या नागनाथ नगरच्या चिंतामणी गणेश मंडळाने जागतिक स्तरावर बहुमान मिळवला आहे. चिंतामणी गणेश मंडळाने आतापर्यंत 1,21,111 माणिक मोती मूर्ती , खेळण्यातल्या गोट्यांचा गणपती, 51 किलो कडधान्याची सजावट असलेला गणपती, तर1,21,111 शर्ट बटनपासून गणपती मूर्ती तयार केली होती.


देशातील सर्व समाजमाध्यमे चिंतामणी गणेश मंडळाची दखल घेतात. माध्यमांबरोबरच सर्व गणेशभक्त या मंडळाच्या सजावटीची वाट पाहत असतात.  चिंतामणी गणेश मंडळाने 2016 मध्ये 1,21,111 माणिकमोती मुर्तीला भारतातील सुबक मूर्तीचे पारितोषिक मिळाले. 


2017 मध्ये खेळण्यातील गोट्यांचा गणपतीची नोंद इंडिया बूक ऑफ रेकॅार्डने घेतली. शेतकरी कुंटुबातील मंडळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून ही मूर्ती तयार करण्यात येते.  साध्या साध्या गोष्टींपासून कोऱ्या गणेश मूर्तीवर सजावट करण्याचे प्राविण्य या मंडळातील कार्यकर्त्यांकडे आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रदूषणाची होणारी हानी रोखण्यासाठी या गणेश मंडळाने यावर्षी या सुबक मूर्तीचे विर्सजन न करता एका आर्ट गॅलरीला देणगी स्वरूपात देण्याचा मानस आहे.


इतर महत्वाच्या बातम्या