सांगली: राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या (municipal elections) निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांनी चाचपणी सुरू केल्याचं चित्र दिसून येत आहे, सर्व पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, केलेली कामे, त्यांचा जनसंपर्क या सर्व बाबी तपासण्या सुरू केल्या आहे. अशातच सांगली मिरज आणि कुपवाडमधील माजी महापौरांसह पंधरा जण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याचं चित्र दिसून येत आहे. या सर्वांनी काल (सोमवारी, ता १५) रात्री पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची घेतली भेट घेतली आहे. लवकरच या माजी नगरसेवकाचा पक्षप्रवेश होणार आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी (शपा) पक्षाशी संबंधित सर्व माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर आली आहे.(municipal elections)
Sangli Mahanagarpalika Election: अजित पवार यांची रात्री पुण्यात भेट घेतली
सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील पंधराहून अधिक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांची रात्री पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीत पक्षप्रवेशावर चर्चा झाली असून लवकरच मिरजेत अजित पवार यांच्या उपस्थितीत या नगरसेवकाचा राष्ट्रवादी काँग्रसमध्ये पक्षप्रवेश देखील होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अजित पवार यांच्या भेटीला गेलेले हे सर्व माजी नगरसेवक भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या माजी महापौरासह दिग्गज नगरसेवकांचा समावेश आहे. यामुळे मिरज शहरात खासदार विशाल पाटील,आमदार जयंत पाटील यांच्यासह भाजपलाही धक्का बसला आहे. (Ajit Pawar)
Sangli Mahanagarpalika Election: भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि पद्माकर जगदाळे या भेटीदरम्यान उपस्थित होते. मिरजेचे माजी महापौर किशोर जामदार यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक करण जामदार, भाजपचे शिवाजी दुर्वे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, आरिफ चौधरी, चंद्रकांत हुलवान, नर्गिस सय्यद, आजम काझी, रमजान सतारमेकर, अंकुश कोळेकर, जनसुराज्यचे आनंदा देवमाने, संतोष कोळी या सर्व माजी नगरसेवकांची नावे आहेत. दरम्यान या घडामोडीमुळे मिरजेतील मिरज शहरात २७ जागा असून या माजी नगरसेवकांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यास भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर एकीकडे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी सुद्धा महाविकास आघाडी एक संघपणे निवडणूक लढवणार असल्याचे सांगितलंय.