Municipal Corporation Election: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अखेर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपताच आज (15 डिसेंबर) दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाने मनपा निवडणुकीची घोषणा केली. अवघ्या एक महिनाभरामध्ये  निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. येत्या 16 जानेवारीपासून बेवारस पडलेल्या महानगरपालिकांना नवे कारभारी मिळणार आहेत. राज्यांमध्ये मुदत संपलेल्या 27 महानगरपालिका आणि नव्याने निर्माण झालेल्या जालना आणि इचलकरंजी या महापालिकेसाठी एकाचवेळी मतदान होईल. 

Continues below advertisement

असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणूक प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ती 16 जानेवारी रोजी संपेल. त्यामुळे राजकीय पक्षांना अवघ्या 29 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरु होईल. अर्ज दाखल करण्याची मुदत 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे. अर्ज माघारीचा दिवस दोन जानेवारी आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्वच महानगरपालिकेत एकाचवेळी रणधुमाळी होणार आहे. 

निवडणूक आयोग काय काय म्हणाला?

  • मनपा पालिका निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाणार आहे. 
  • ही मतदार यादी भारतीय निवडणूक आयोगाची (Election Commission of India) आहे.
  • मतदार यादीसंदर्भात काही तक्रारी आणि आक्षेप आले होते, ज्यांचे स्पष्टीकरण देण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. 
  • ज्या अधिकाऱ्यांनी 5 वर्षे पूर्ण केली आहेत किंवा काही प्रकरणांमध्ये 3 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांची बदली करण्याचे धोरण आहे.
  • निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांचा विश्वास संपादन करूनच महानगरपालिकेची निवडणूक घोषित केली आहे.
  • निवडणूक घोषित करण्यापूर्वीच राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली होती.
  • मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात अनेक राजकीय पक्षांनी चिंता व्यक्त केली होती, परंतु निवडणूक आयोगाने त्यांचे समाधान केले आहे.
  • मुंबई महानगरपालिकेने (BMC) दुबार मतदार शोधण्यासाठी एक विशेष टूल (Tool) विकसित केले आहे. राजकीय पक्षांनी या टूलबद्दल पूर्ण समाधान व्यक्त केले आहे आणि त्यांनी इतर महानगरपालिकांना देखील हे टूल वापरण्याची शिफारस केली आहे.
  • दुबार मतदारांची माहिती राजकीय पक्षांना पुरवण्यात आली आहे.
  • मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत 7 टक्के मतदार हे दुबार आढळून आले आहेत, तर एकूण दुबार मतदार 5 ते 20 टक्के आढळून आले आहेत.
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही त्यांच्याकडे दुबार मतदारांसाठी टूल विकसित केले आहे.
  • राजकीय पक्षांना 'वोटर्स सर्च फॅसिलिटी' पोर्टलवर पूर्णपणे दाखवण्यात आली.
  • त्यांना 'मताधिकार ॲप' देखील दाखवण्यात आलं आहे.
  • नागपूर आणि चंद्रपूरसह काही महानगरपालिकांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
  • आरक्षण 50 टक्क्यांवर चात असले तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा महानगरपालिकांच्या निवडणुका तात्काळ कंडक्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • 23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत  
  • नामनिर्देशन छानणी 31 डिसेंबर रोजी होणार
  • उमेदवारी अर्ज माघारी मुदत 2 जानेवारी 2026 
  • चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी 
  • मतदान 15 जानेवारी 2026 
  • मतमोजणी 16 जानेवारी 2026 

इतर महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement