Sangli Crime : सांगली जिल्ह्यामधील (Sangli Crime) जत तालुक्यातील सिंदूरमध्ये मातेने आपल्या दोन मुलासह स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. नऊ महिन्याच्या लहान मुलाचा मृतदेह रात्री नऊ वाजता पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने त्यास बाहेर काढून रात्री जत ग्रामीण रुग्णालयात शवविछेदनासाठी आणण्यात आला. त्यानंतर सोमवारी मायलेकींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. लक्ष्मी धनेश माडग्याळ (वय 23) दिव्या धनेश माडग्याळ व दोन वर्ष व व नऊ महिन्याचा मुलगा श्रीशैल अशा तिघांचा मृत्यू झाला.
घरगूती वादातून आत्महत्या केल्याचा संशय
जत तालुक्यातील सिंदूर येथील लक्ष्मी धनेश माडग्याळ हिचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिचे भगवान येतील एका तरुणाशी विवाह ठरला होता. मात्र, तिने पसंत नसल्याने गावातीलच धानेश सिद्दनिंग माडग्याळ या युवकाबरोबर लग्न केले. धनेश माडग्याळ यांच्याबरोबर तिने पळून जाऊन लग्न केले होते. त्यावेळी जत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल होती. तिचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते परत गावी येऊन सिंदूर पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आढळहाटी रोडवर स्वतःच्या शेतात राहत होते. तिला एक मुलगी व एक मुलगा आहे.
प्रेम प्रकरणातून प्रकरण मिटवण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना धनेश माडग्याळ याने काही रक्कम दिली होती, या वादातून त्यांचे सारखे खटके व भांडण होत होते. यातूनच तिने आत्महत्येचे मोठे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात सुरू होती. आत्महत्या नंतर लहान मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
ग्रामस्थांनी रविवारी रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढून जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दोघांचे मृतदेह सांगोल्याच्या पथकाला बोलावून बाहेर काढण्यात आले. जत पोलीस ठाण्यात मात्र मयत नोंद झाली असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. यामुळे सिंदूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या