सांगली : कोणत्या ना कोणत्या कारणामुळे किंवा वक्तव्यामुळे किंवा त्यांच्या कृतीमुळे सातत्याने चर्चेत असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आणि अजित पवार गटामध्ये कलगीतुरा रंगला असतानाच आता एका नवीन कारणामुळे गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं नवीन गाणं समोर आलं आहे. त्यांच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे या गाण्यावरून कमेंटवर कमेंट सोशल मीडियामध्ये पडत आहेत. त्या गाण्याचं नाव आहे "आमच्या गाडीला बीरेक न्हाय बरका". याच गाण्यावर पडळकर थिरकले आहेत. झकासमध्ये डान्स पाहून सोशल मीडियात कमेंट केल्या जात आहेत. 



 गोपीचंद पडळकर दिसतील तिथं चोप देणार


दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही उल्लेख केला, पण अजित पवारांचा उल्लेख नव्हता. त्यावर प्रश्न विचारल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी आम्ही अजित पवारांना मानत नाही. अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यामुळे मी त्यांना पत्र लिहायचा विषय नाही. ते आता जरी आम्हच्यासोबत आले असले तरी त्यांची भूमिका वेगळी आहे. आम्ही अजित पवारांना उपमुख्यमंत्री मानत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. पडळकरांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली. 


गोपीचंद पडळकर दिसतील तिथं चोप देणार


गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले. अजित पवारांचे समर्थक थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उतरले. सोमटने फाटा येथे त्यांनी पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या