Sangli News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विटामध्ये हजारो गरजू रुग्णांसाठी मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवत या आरोग्य शिबिराला शुभेच्छा दिल्या. 


खानापूर तालुक्यातील गाव खेड्यातील गरजू लोकांसाठी हे आरोग्य शिबिर फायदेशीर ठरेल, अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलत या आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल आमदार अनिल बाबर यांचे आभार मानले. बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन व विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या  महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 


आमदार बाबर म्हणाले, मुख्यमंत्री गरजू रुग्णांचे एकनाथ 


विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सतत टीका करत असतात. मात्र, मुख्यमंत्री राज्यातील गरजू रुग्णांसाठी  बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मदत करत असतात. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री हे गरजू रुग्णाचे एकनाथ आहेत, अशा भावना हे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करणारे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.  


दरम्यान, सुमारे दीडशेहून अधिक आरोग्य अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, आशा सेविका व 500 स्वयंसेवक या महाआरोग्य शिबिरासाठी कार्यरत  होते. शिबिरात तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात हजारो रुग्णांनी नोंदणी करत तपासणी करुन  घेतली. रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यात आले होते. विटा शहर व उपनगरातही वाहनांची तसेच एसटी गाड्यांचीही सोय करण्यात आली होती. रुग्णांना कसलीही अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी एक मध्यवर्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आला होता. 


सुसज्ज मेडिकलची उभारणी


शिबिरस्थळी अत्यंत सुसज्ज मेडिकल उभारण्यात आले होते. अल्पावधीत हे मेडिकल उभारण्यात आले होते.  मेडिकल हे शिबिराचे आकर्षण बनले. शिबिराच्या दिवशी रुग्णांना औषधे देण्यासाठी तब्बल 50 फार्मसिस्ट सेवा देत होते. सर्व आजारांवर मोफत औषधे या ठिकाणी रुग्णांना मिळाली.


इतर महत्वाच्या बातम्या