Sangli Crime : मिरज कोल्हापूर महामार्गावर (Sangli News) पाटील पेट्रोल पंपाजवळ (Sangli Crime) इनोव्हा आणि दुचाकीचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल आहे. सिद्धार्थ परसू कांबळे आणि सदाशिव बाबू कांबळे (रा. गुगवाड, ता. जत, सध्या रा. शिरोळ, संगपाळ वीटभट्टी) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या अपघाताची नोंद  मिरज ग्रामीण पोलिसांमध्ये झाली असून अधिक तपास करत आहेत. 


विरुद्ध दिशेने आले आणि जीवाला मुकले


दोघेही वीटभट्टी कामगार असून धामणी येथे नातेवाईकांकडे दुचाकीवरुन गेले होते. धामणीकडून विरुद्ध बाजूने मिरजेच्या दिशेने दोघे येत असताना मिरजेकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हाची त्यांच्या गाडीला समोरासमोर धडक झाली. त्यामुळे या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकी वाहनाचा चक्काचूर झाला. इनोव्हा वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. 


अल्पवयीन युगूल बाईकसह विहिरीत पडले


दरम्यान, सांगली जिल्ह्यातील तासगाव (Sangli Crime) तालुक्यात दोन वेगवेगळ्या गावांतील अल्पवयीन प्रेमीयुगूल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना 1 फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेत युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर युवक बचावला.


अल्पवयीन प्रेमीयुगुल गावाशेजारी असणाऱ्या एका ठिकाणी गेले होते. काही वेळानंतर युवतीला घरी सोडण्यासाठी ते दोघेजण दुचाकीवरून घरी परत असताना वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीत ते दोघेजण दुचाकीसह कोसळले. युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला. युवक रात्रीच विहिरीबाहेर आला. पण युवतीला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर युवतीच्या पालकांनी तासगाव पोलिसांत संबंधित युवकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके अधिक तपास करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या