Gopichand Padalkar : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) हे खानापूर-आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत असा गौप्यस्फोट भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  यांनी केला आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघात 2024 मध्ये भाजपचा (BJP) उमेदवार असेल असा दावाही पडळकरांनी केला आहे. पडळकरांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


 खानापूर-आटपाडीत (Khanapur Atpadi Assembly Constituency) 2024 मध्ये भाजपचा आमदार असेल. आमदार अनिल बाबर (Anil Babar) 2024 मध्ये निवडणूक लढवणार नाहीत, असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर आटपाडीमध्ये आता भाजपचा आमदार असेल असा गौप्यस्फोट केला आहे. खानापूर तालुक्यातील मोही येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभासाठी पडळकर बोलत होते. गोपीचंज पडळकर हे कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात


 बारामती विधानसभा मतदारसंघात  2019 साली  निवडणूक लढवत होतो. त्यावेळी आमदार बाबर व त्यांचे पुत्र अमोल बाबर यांनी बारामतीच्या क्लब हाऊसमधील पहाटेच्या बैठकीत मला 2024 ला तुमच्या पाठीशी राहत असल्याचा शब्द दिला होता. तो शब्द आता ते पिता-पुत्र पाळतील. त्यामुळे बाबर हे खानापूर मतदारसंघात 2024 ची निवडणूक लढविणार नाहीत असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय


अनिल बाबर भाजपकडून लढणार की शिंदेंकडून? असे अनेक प्रश्न पडळकरांच्या वक्तव्यावरून निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अनिल बाबर हे खानापूर मतदारसंघात 2024 ची निवडणूक लढविणार नाहीत असा गौप्यस्फोट आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यामुळे आता शिंदेगट काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.


कोण आहेत अनिल बाबर?


अनिल बाबर हे शिवसेनेचे आमदार होते. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अनिल बाबर हे 40 आमदरांसह गुवाहटीला गेले. बाबर सध्या खानापूर-आटपाडी मतदार संघाचे विधानसभत प्रतिनिधित्व करतात. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात  अनिल बाबर सध्या आहेत. अनिल बाबर यांचे पुत्र  सुहास बाबर हेही राजकीय जीवनात सक्रिय आहेत. पडकळरांच्या या वक्तव्यानंतर अनिल बाबर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


संबंधित बातम्या :