Maharashtra Accident Sangli News : सांगलीतील (Sangli) एका अपघातात (Accident News) तीन तरुणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील (Jat District) कोसारी गावात ही घटना घडली आहे. एकाच दिवशी गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 


सांगलीतील जत तालुक्यातील चार मित्र एकाच दुचाकीवरुन जात होते. रात्री उशीरा ही घटना घडली. त्यावेळी बिरनाळ ओढ्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्यानं अपघात घडला. जत तालुक्यातील बिरनाळ ओढ्याजवळ ही दुर्घटना घडली. कोसारी येथील चार मित्र एका दुचाकीवरुन जतहून त्यांच्या गावी कोसारीकडे निघाले होते. बिरनाळ ओढ्याजवळ असलेल्या वळणावर दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटला. या अपघातात दुचाकी चालवत असलेला अजित भोसले (वय 22) हा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी झालेले मोहीत तोरवे (वय 21) आणि राजेंद्र भाले (वय 22) यांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. तर या तरुणांचा चौथा मित्र संग्राम तोरवे (वय 16) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 


दरम्यान, बिरनाळ नजीक असणाऱ्या या धोकादायक वळणावर ओढा पात्रानजीक मोटरसायकलवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. एकाच मोटरसायकलवर चौघेजण प्रवास करत होते. यातील अजित भोसले हा जागीच ठार झाला. स्थानिकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघाताचं गांभीर्य ओळखत मोहित तोरवे, राजेंद्र भाले, संग्राम तोरवे या तिघांना बिरनाळ रुग्णालयात उपचारासाठी तातडीनं दाखल केलं होतं. मात्र गंभीर जखम झाल्यामुळे मोहित तोरवे, राजेंद्र भाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच दिवशी तीन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्यानं कोसारी गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू