Maharashtra Cabinet Expansion : सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून 2004 साली भाजपच्या उमेदवारीवर पहिल्यांदा सुरेश खाडे हे आमदार झाले. सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले खाडे हे भाजपाचे पहिले आमदार आहेत. त्यांनतर 2009 साली मिरज विधानसभा राखीव मतदारसंघातून सुरेश खाडे दुसऱ्यांदा निवडून आले. 


2014 मध्ये मिरजमधून दुसऱ्यांदा खाडे पुन्हा आमदार झाले. ते 2014 ला सुरेश खाडे प्रचंड मतांनी निवडून आले. त्यावेळी त्यांच्या विरोधात उभे असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सहित अन्य सर्व उमेदवारांच निवडवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले होते. त्यांनतर 2019 साली मिरजेतून सलग तिसऱ्यांदा खाडे निवडून आले. आणि एकूण चार वेळा सुरेश खाडे हे आमदार झाले आहेत. 


भाजपचे ताकतवान नेते अशी खाडे यांची ओळख आहे. सुरुवातील जत आणि नंतर मिरजमधून निवडून आलेले खाडे हे लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात. 2014 पूर्वी विरोधी पक्षातील आमदार असतानाही, त्यांनी आपल्या मतदारसंघात मोठी विकासाची कामे केली.


2014 ला भाजपची राज्यात सत्ता आल्यानंतर सुरेश खाडे यांच नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत होत. मात्र, त्यावेळी त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकली नव्हती. 2014 ला मुंबईत तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा मुखमंत्री म्हणून शपथ विधी झाला. मात्र, त्यावेळी सांगली जिल्ह्याला मंत्रिपद मिळू शकल नव्हतं. त्यावेळी महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पहिल्यांदाच सांगली जिल्ह्याला मंत्रिपद मिळू शकलं नव्हतं.


शेवटच्या टप्प्यात 2019 मध्ये मात्र मंत्रिमंडळ विस्तारात खाडे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मंत्री सुरेश खाडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळत आहे. सांगली जिल्ह्यातून भाजपकडून आमदार सुरेश भाऊ खाडे आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्यात मंत्रिपदासाठी चुरस होती. मात्र अंतिम टप्प्यात आमदार सुरेश खाडे यांनी बाजी मारली. 


सुरेश खाडे यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची कारणे



  • सुरेश खाडे हे सांगली जिल्ह्यातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

  • सांगली जिल्ह्यात भाजप कमळ प्रथम सुरेश खाडे यांच्या रूपाने फुलले

  • आधी जत आणि 3 वेळा मिरज अशा एकूण चार वेळा सुरेश खाडे हे आमदार झालेत

  • भाजप आमदारामधील मागासवर्गीय (चर्मकार समाज) मधील चेहरा असल्याने मंत्रिपदाची संधी

  • मूळचे तासगाव तालुक्यातील पेड गावचे असले, तरी जत आणि मिरज विधानसभा मतदारसंघात देखील खाडे यांचा प्रभाव

  • मुंबईत जाऊन उद्योग क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या दास कंपनीचा विस्तार केलेल्या अशोक खाडे यांचे सुरेश खाडे हे बंधू

  • 2019 साली शेवटच्या टप्प्यात  मंत्रिमंडळ विस्तारात खाडे यांना केवळ  3 महिन्यांसाठी  कॅबिनेट मंत्री पद मिळालं होतं