Sangli Rain Update : सांगलीमध्ये कृष्णेची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. दुसरीकडे चांदोली धरण 85 टक्के भरल्याने चांदोली धरणातील विसर्ग वाढवत तो 9 हजार 448 क्यूसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. दोन्ही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ सुरुच आहे. चांदोली धरण 85 टक्के भरल्याने विसर्ग वाढविण्यात आला. धरणातून 5 हजार 628 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर आणि धरणातील विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.


वारणा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत, पावसाचा जोर सुरु राहिल्यास सकाळपासून पुन्हा वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे.यामुळे कोयनेतन विसर्ग केल्यास कृष्णा नदीची पातळी वाढू शकते