Siddaramaiah in Maharashtra: कर्नाटकमध्ये आम्ही भाजपला मुळासकट फेकून दिले, आता देशासह महाराष्ट्रातून उखडून टाकण्याची आमची जबाबदारी असल्याचा हल्लाबोल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून आज सिद्धरामय्या यांचा सांगलीत (Sangli News) भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी महानिर्धार मेळावा पार पडला. सत्कारप्रसंगी बोलताना सिद्धरामय्या यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार देखील भ्रष्ट असून कोणत्याही परिस्थितीत नेस्तनाबूत करून उखडून टाका, असे आवाहन केले. 


सिद्धरामय्या म्हणाले की, मुळासकट भाजपाला फेकून देण्याची गरज असून ती जवाबदारी सर्वांची आहे. कर्नाटकात भाजप कधीही जनतेच्या आशीर्वाद घेऊन निवडून आले नाही, केवळ ऑपरेशन कमळ आणि आमदार खरेदी करून सत्तेवर आले. ऑपरेशन कमळ हे आमदार खरेदी विक्रीचा उद्योग आहे. कोट्यवधी खोके देऊन आमदार खरेदी करण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रतील शिदे-फडणवीस सरकार देखील भ्रष्ट आहे. शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रातून कोणत्याही परिस्थितीत नेस्तनाबूत करून उखडून टाकले पाहिजे.


ते पुढे म्हणाले की, देशात असो किंवा राज्यातील भाजप सरकार असो त्यांचे विकासाचे धोरण नाही. फक्त एक उद्योग आहे तो म्हणजे लाच घेणे, लाच देणे आहे. प्रत्येक कुटुंबाला मोफत तांदूळ देण्याचा निर्णय आम्ही घेतला, पण केंद्रातील भाजप सरकारने फूड कॉर्पोरेशनला कर्नाटकला तांदूळ देऊ नये, अशी ताकीद दिली आहे. गरीब जनतेला मोफत तांदूळ मिळू नये, असा प्रयत्न असून तांदूळ वाटपामध्ये भाजप सरकार राजकारण करत आहे. केंद्राकडे आम्ही फुकट तांदूळ मागत नाही, तांदूळ विकत घेऊन आम्ही मोफत वाटणार आहे, पण केंद्रातील भाजप सरकार गोरगरिबांच्या विरोधातील सरकार आहे.


देशाच्या इतिहासात खोटे बोलणारे पंतप्रधान कोण असेल तर ते नरेंद मोदी 


सिद्धरामय्या म्हणाले की, कर्नाटक सरकारने पदवीधरांना बेरोजगार भत्ता देण्याचे काम करत आहे. देशाच्या इतिहासात खोटे बोलणारे पंतप्रधान कोण असेल, तर ते नरेंद्र मोदी आहेत. आपल्या आयुष्यात आपण असला खोटे बोलणारे पंतप्रधान पाहिला नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील भाजप सरकार नेस्तनाबूत करून उघडून टाकण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर पाणी वाटपाचं योजना आहे, त्या योजनेबाबत चर्चा करून, त्या ठिकाणी पाणी देण्याचे काम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या