Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातून करण्यात आलेल्या घोषणांवरून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. घोषणा करताना एक देवस्थानही सोडलं नाही, मिळणार, तर काहीच नाही. देवही यांच्या नावाने ठणठण करतील, अशी बोचरी टीका त्यांनी केली. सरकार बरखास्त होणार असल्याने आभाळभर घोषणा करण्यात आल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांची मुंबईत होत असलेली पोस्टरबाजी पाहूनही त्यांनी चांगलीच फटकेबाजी केली. ते सांगलीच्या (Sangli News) बेडगमध्ये बोलत होते. 


आत्मविश्वास नसलेलं सरकार 


जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, आत्मविश्वास नसलेलं ,हे सरकार असून बरखास्त होणार असल्याने आभाळभर घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, यातलं काहीच होणार नाही आणि देव देखील यांच्या नावाने ठणा ठणा करतील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 


निवडणूका घेण्यास घाबरले 


यावेळी भाजप सरकारवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले की, पुढील फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागतील. धाडस केलं तर विधानसभेच्या निवडणुका होतील, पण हे सरकार हे सरकार जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका घेण्यास घाबरलं आहे. मुंबईत तर जिकडे-तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच नमस्कार करत असलेले फलक झळकत आहेत. ज्यावेळी माणसाचा आत्मविश्वास कमी होतो आणि सारखे लोकांच्या समोर पाहिजे असे होतो. असे आत्मविश्वास नसलेले सरकार महाराष्ट्रात काम करत असल्याची टीका त्यांनी केली.


घोषणा करायला काय बिघडतं  


सरकार बरखास्तच करायचं असेल आणि विधानसभेच्या निवडणुका सामान्य ने घ्यायचे असतील, तर घोषणा करायला काय बिघडतं त्यामुळे या सरकारने अर्थसंकल्पामध्ये आभाळा एवढ्या घोषणा करण्यात आल्या आहेत, पण आभाळभर घोषणा करताना खिशात पैसे नाहीत, याचे कसले ही तारतम्य सरकारला राहिले नाही. या घोषणा करताना राज्यातले एकही देवस्थान सोडले नाही. सगळ्या देवस्थानांना पैसे दिले आहेत, पण पैसे देणारच नाही, त्यामुळे देव देखील यांच्या नावाने ठणा ठणा करतील. 


इतर महत्वाच्या बातम्या