Sangli News : कृष्णा नदीतील (Krishna River) लाखो माशांच्या मृत्यूप्रकरणी (Fish dead) प्रदूषण नियंत्रण मंडळानं सांगलीतील दत्त इंडिया साखर कारखान्याला ( Shree Datta Sugar Factory) जबाबदार धरले आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळानं (Maharashtra Pollution Control Board) कारखान्याला नोटीस बजावली आहे. दत्त इंडिया साखर कारखान्याचे सांडपाणी शेरीनाल्यातून कृष्णा नदीत मिसळल्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठपका ठेवला आहे. त्यामुळं  दत्त इंडिया कारखाना बंद का करु नये? वीज का कापू नये? याबाबतची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूरमधील प्रादेशिक विभागानं काढली आहे. तसेच सांगली महापालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल का करु नये याबाबतही नोटीस काढली आहे.


स्वाभिमानी आक्रमक, आयुक्तांच्या बंगल्यासमोर फेकले मासे


सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदीतील मासे मृत्यूनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या काही कार्यकर्त्यांनी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सांगली महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर मृत मासे फेकले होते. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदीच्या प्रदूषणाबाबत होणाऱ्या हलगर्जीपणाचा निषेध केला होता. याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दत्त इंडिया साखर कारखान्याला नोटीस बजावली आहे. प्रदुषण विभागाचे अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यानं सर्वसामान्य जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याप्रकरणी मुग गिळून गप्प असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. 


20 हून अधिक गावांना फटका 


महापालिका क्षेत्रातील लाखो लिटर सांडपाणी थेट किंवा शेरीनाल्याच्या माध्यमातून नदी पात्रात मिसळत असल्याने नदी प्रदूषित होऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.  शुक्रवारी कृष्णा नदीत दत्त इंडीया संचलित वसंतदादा साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी कृष्णां नदीत मिसळल्यानेच मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित होऊन अंकली नजीक हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीतून समोर आलं आहे. सदरच्या मृत माशामुळं नदी आणखी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाली आहे. याचा फटका जयसिंगपूर शहरासह मिरज,
अंकली आणि शिरोळ तालुक्यांतील 20 हून अधिक गावांना बसणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी केला आहे. तसेच संतप्त स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगली महापालिका आयुक्त सुनील पावर यांच्या निवासस्थानी मृत मासे फेकले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Sangli News : कृष्णा नदी पात्रात मृत माशांचा खच, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; आयुक्तांच्या निवासस्थानासमोर फेकले मृत मासे