Sangli News : दिवाळीनिमित्त अनेक कंपनीकडून कर्मचाऱ्यांना आकर्षक गिफ़्ट, बक्षीस दिल्याचे आपण पाहतो. काही कंपनीनी तर चारचाकी देखील कर्मचाऱ्यांना भेट दिल्याचे आपण पाहिलं आहे. सांगलीतील भारती क्रीएशन या स्मार्ट कार्ड बनवणाऱ्या कंपनीने आपल्या कंपनीमधील उत्कृष्ट काम करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना iPhone भेट दिले आहेत. जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांच्या हस्ते ही भेट कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
सांगलीत भारती क्रिएशन ही मागील 10 वर्षांपासून काम करत आहे. स्मार्ट कार्ड बनवण्यामध्ये देशात या कंपनीचे नाव एक नंबरवर आहे. दिवसाला 5 लाख स्मार्ट कार्ड बनवण्याची या कंपनीची ताकद असून तशा पध्दतीने लाख स्मार्ट कार्ड एका दिवसात बनवून डिलिव्हर देखील या कंपनीने केले आहेत. एकूण 110 कामगार या भारती क्रीएशन कंपनीत काम करतात. भारती क्रीएशन ही कंपनी स्मार्ट कार्ड बनवण्यामध्ये देशात या कंपनीचे नाव एक नंबर वर आहे.
कंपनीचा मालक म्हणून ज्या पद्धतीने माझी लाइफस्टाइल असेल अगदी त्याचप्रमाणे माझ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची देखील लाइफस्टाइल असावी असे मला नेहमी वाटत असे, संचालक श्रेयस ओऊळकर यांनी सांगितले. त्यामुळे कंपनीतील उत्कृष्ट काम करणाऱ्या १५ कामगाराना मी iPhone दिवाळीनिमित्त गिफ्ट केले आहेत.
सांगलीतील भारती क्रिएशन ही पीव्हीसी स्मार्ट कार्ड तयार करणारी भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. पीव्हीसी स्मार्ट कार्डच्या उत्पादनांबरोबरच प्रिंटिंग क्षेत्रातही कंपनीचा नावलौकिक आहे. भारती क्रिएशन्समध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांसाठी ग्रोइंग टुगेदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात या भेटवस्तू वाटप करण्यात आल्या.
इतर महत्वाच्या बातम्या