सांगली : मराठा आरक्षण प्रश्नावरून (Maratha Reservation) आज सांगली जिल्ह्यातील (Sangli News) आमदार-खासदारांना मराठा समाजाने चांगलेचं धारेवर धरलं. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या पालकमंत्री खासदार, आमदारांना गाठत मराठा समाजाने प्रश्नांचा भडीमार केला. अगदी राजीनामा देण्यापासून मराठा समाजाचे आमदार खासदार आता काय भूमिका घेणार? यावर आक्रमक पवित्रा घेतला. 


मराठा आरक्षण मागणीसाठी एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय


मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांकडून मुख्यमंत्र्यांना एक दिवसीय अधिवेशन घेण्याबाबत पत्र तसेच मराठा आरक्षण मागणीसाठी एकदिवसीय उपोषण करण्याचा जाहीर करण्यात आले आहे. उद्या सोमवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदार मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याचे जाहीर केले. या बैठकीला पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड , विशाल पाटील उपस्थित होते.


मराठा आरक्षणासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात वणवा पेटू लागला आहे. आज सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील खासदार, पालकमंत्री सर्व आमदाराना अडवून धरत जाब विचारला. मराठा आरक्षण प्रश्नी चार दिवसात निर्णय घ्यायला सांगा, नाही तर सांगली जिल्ह्यातील आमदार, खासदारांना चार दिवसात राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी  एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची आग्रही मागणी करण्यात आली.


आरक्षण देण्याचा विषय मुख्यमंत्री सोडवतील


दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच मराठा समाजाला आरक्षण देतील, हा माझा व्यक्तिगत विश्वास असल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे. सांगलीमध्ये कालवा समितीच्या बैठकीसाठी आले असताना शहाजी बापू माध्यमांशी बोलत होते. माझ्या भावना मराठा समाजाबरोबर आहेत. कारण मराठा समाजाला इथून पुढं उपजीविकेचे साधन शिल्लक राहणार  नाही. 


कोल्हापुरात साखळी उपोषण 


दुसरीकडे, कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या सर्व संघटनेच्या नेत्यांनी क्रांतीची मशाल पेटवून या आंदोलनाचे रणशिंग फुंकले. विश्वासघात करणाऱ्या सरकारला इशारा दिला होता, परंतु यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा एल्गार मराठ्यांनी पुकारला. या आंदोलनात मराठा समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.


दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजातील सर्व संघटनांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला. यासाठी घातलेल्या भव्य मंडपात मराठा समाजातील सर्व नेते आणि कार्यकर्ते उपोषणास बसले होते. आंदोलनास प्रारंभ करण्यापूर्वी नेत्यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. क्रांतीची मशाल प्रज्वलित करुन साखळी उपोषणास प्रारंभ झाला.


इतर महत्वाच्या बातम्या