Gopichand Padalkar on Miraj disputed land : मिरजेतील वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी रातोरात दुकाने पाडल्याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांना तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी दणका दिला आहे. जागेवरील मिळकतधारकांचा कब्जा सिद्ध करून पडळकर यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागावी, असा आदेश तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी दिला आहे. 


दरम्यान, हा निकाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar on Miraj disputed land) यांनी अमान्य केला आहे. तहसीलदारांनी दिलेल्या निकालानंतर स्वतः आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुढे येत  निकाल माझे भाऊ ब्रह्मानंद पडळकरच्या विरोधात वगैरे काही नसल्याचे म्हटलं आहे. तालुका दंडाधिकारी यांनी दिलेला अंतिम निकाल आमच्या वकिलांनी पूर्ण वाचला असून निकालात माझे भाऊ ब्रह्मानंद पडळकरच्या नावावरील प्लॉटचा कब्जा तहसीलदारांनी मान्य केला आहे, असा दावाही पडळकर यांनी केला. 


आमच्या जागेत कोणीही अतिक्रमण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही पडळकर यांनी दिला. ज्या 17 मिळकतधारकांनी कब्जा मिळाल्याचे सांगितलं आहे त्यांचा आणि आमच्या मिळकतीशी कोणताही संबंध नसल्याचेही पडळकर यांनी म्हटलं आहे. तहसीलदारांनी तसाच निर्णय दिलेला आहे आणि ज्या जागेचा वाद आहे ती सिटीसर्वेनुसार आपल्याच कब्जात असल्याचाही तहसीलदारांच्या निर्णयानंतर स्पष्ट झाले असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. मात्र, ज्या 17 मिळकतधारकांनी जागेचा कब्जा मिळाल्याचं सांगितला आहे, त्यांच्या सिटी सर्व्हेचा नंबर हा वेगळा आहे, आणि आपल्या जागेचा नंबर वेगळा असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. 


अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार 


या जागेवरून आमच्यावर ज्या लोकांनी आरोप आणि टीका केली, त्यांच्यावर आता अब्रूनुकसानीचा दावा देखील दाखल करण्यात येणार असल्याचेही गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले. जी आमची जागा आहे,ती ताब्यात घेण्यासाठी आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारचा अतिक्रमण करू नये, यासाठी पोलीस प्रमुख असतील किंवा संबंधित प्रशासन असेल यांच्याकडे मागणी देखील करणार असल्याचे आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. 


काय आहे प्रकरण?


मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असणारी 51 गुंठे जागा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेत माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी विकत घेतल्याचा दावा केला होता. या जागेवर मिळकतधारकांनी अतिक्रमण केलं असून ती काढण्यासाठी पळकरी यांनी त्यांच्या टोळीसह चार जेसीबी घेऊन रातोरात दुकाने पाडली होती.  जागा माझीच असून अतिक्रमण काढण्यासाठी दुकाने पाडले असल्याचा दावा पडळकर यांनी केला होता.


ब्रह्मानंद टोळीने घातलेल्या धुडगूसात एकूण दहा दुकानांचे सुमारे सव्वा कोटी रुपयांची नुकसान झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी पडळकर यांच्यासह टोळीतील 100 जणांना गुन्हा दाखल केला होता. परंतु, पडळकर टोळीने घातलेल्याराड्या नंतर मिळकतधारकांकडून जागेवर प्रत्यक्ष कब्जा असल्याचा दावा करण्यात आला होता. घडलेल्या प्रकारानंतर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार कुंभार यांनी याबाबत सुनावणी घेण्यात आली. 


इतर महत्वाच्या बातम्या