Jio True 5G services : कोल्हापूर आणि सांगली शहर आज जिओ ट्रू 5G नेटवर्कशी (Jio True 5G services in kohapur & Sangli) जोडले गेले आहे. देशातील 17 राज्यातील 50 शहरांमध्ये एकाच दिवशी 5G सेवा सुरु केली आहे. जिओ वेलकम ऑफर सांगली कोल्हापूरसह महाराष्ट्रातील नांदेड येथेही सुरू झाली आहे. ऑफर अंतर्गत यूझर्सना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1Gbps+ वेगाने अनलिमिटेड डेटा मिळेल.


कोल्हापूर आणि सांगलीशिवाय महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर आणी अहमदनगर येथे जिओ 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओ ट्रू 5G सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यांना एक जिओ 5G नेटवर्क सुसंगत 5G हँडसेट, राहत्या / कामाच्या ठिकाणी 5G नेटवर्कची उपलब्धता तसेच प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड यूझर्ससाठी 239 किंवा अधिक वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल. एकदा या निकषांची पूर्तता झाल्यानंतर, जिओ ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळेल. शहरातील जिओ यूझर्सना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1Gbps+ पर्यंत स्पीडवर अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल.


जिओच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, “कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जिओ ची 5G सेवा (Jio True 5G services in kohapur & Sangli) सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. कोल्हापूर आणि सांगली शहरात 5G सेवा सुरू करणारा जिओ हा पहिला ऑपरेटर आहे. आम्ही जिओ ट्रू 5G तंत्रज्ञान विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह कोल्हापूर, सांगली आणि महाराष्ट्रातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. महाराष्ट्र डिजिटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत.”


दरम्यान, आपल्याकडे Jio 5G च्या कव्हरेज असलेल्या भागात (Jio True 5G services in kohapur & Sangli) राहत असाल आणि तुमच्याकडे आधीपासूनच 5G- सक्षम स्मार्टफोन (5G-enabled smartphone) असेल, तर तुम्हाला Jio वेलकम ऑफरचा एक भाग म्हणून अमर्यादित 5G डेटासह Jio 5G चा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केले जाईल. Jio कडून सध्या कोणतेही वेगळे 5G प्लॅन नाहीत आणि यूझर्सना Jio 5G चा अनुभव घेण्यासाठी नवीन Jio सिम घेण्याची गरज नाही.


इतर महत्वाच्या बातम्या