Sangli Police : सांगली पोलिस दलातील (Sangli Police) आणि मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांना (API Raviraj Phadnis awarded the Best Life Saving Medal for gallantry) राष्ट्रपतींकडून उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर करण्यात आले. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस मुख्यालयातील संचलन कार्यक्रमात रविराज फडणीस यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक करत पुरस्कार मिळल्याबद्दल अभिनंदन केले.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिघांचे प्राण वाचवले
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली. 30 नोव्हेंबर 2021 रोजी मिरजेतील औद्योगिक वसाहतीतील केमीकल कारखान्याला आग लागली होती. त्यावेळी सहाय्यक निरीक्षक फडणीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांचे प्राण वाचवले होते. आगीच्या लोटांमध्ये अडलेल्या या लोकांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी वाचवले होते. यामध्ये ते भाजून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या या धाडसी कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडे त्यांना पदक देण्यासंदभार्त प्रस्ताव पाठवला होता.
महाराष्ट्रातून केवळ फडणीस यांची निवड
फडणीस यांच्या कार्याची दखल घेत आज त्यांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातून केवळ फडणीस यांनाच हे पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे जिल्ह्यासह राज्यातून अभिनंदन होत आहे. लवकरच त्यांना राज्यपालांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. उत्तम जीवनरक्षक पदकासाठी महाराष्ट्रातून केवळ फडणीस यांची निवड करण्यात आली आहे. दीड लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह, पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सहाय्यक निरीक्षक फडणीस राज्याच्या पोलिस दलात 2011 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आदी जिल्ह्यात सेवा बजावली. सांगली जिल्ह्यात 2019 मध्ये सेवेत रूजू झाले. त्यानंतर त्यांनी सांगली एलसीबीत काम केले. सध्या ते मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात प्रभारी म्हणून कायर्रत आहेत. नागरिकांचे जीव वाचवणाऱ्या अधिकारी, कमर्चाऱ्यांना राष्ट्रपतींकडून जीवन रक्षा पदक देण्यात येते. यावर्षी सात जणांना सवोर्त्तम जीव रक्षा पदक, आठ जणांना उत्तम जीवन रक्षा पदक तर 28 जणांना जीवन रक्षा पदक जाहीर करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या