Gopichand Padalkar on Uddhav Thackeray : सांगली जिल्ह्यात (Sangli News) संजय राऊत यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते अधिक होते. ठाकरे आणि राष्ट्रवादी हे एकमेकांना सध्या सांभाळून घेत असल्याचा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी यांची अवस्था "म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा" अशी झाल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. 


संजय राऊत वेडा झालेला माणूस


गोपीचंद पडळकर म्हणाले की, राऊत हा फार वेडा झालेला माणूस आहे. शिवसेनेची पूर्णपणे राख रांगोळी झाली, आता तरी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कुठेतरी थांबायला हवं. राऊत यांनी शरद पवारांच्या हातात हात घालून शिवसेना पूर्ण संपवली, तरी देखील राऊत शांत बसायला तयार नाहीत. विधिमंडळाला चोरमंडळ आणि निवडणूक आयोगाला शिव्या घालण्यापर्यंत राऊत बडबड करत असतात. त्यामुळे संजय राऊत  यांना मिरजेतील कृपामाई हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची गरज आहे. 


शरद पवारांच्या हातात हात घालून शिवसेना संपवून सुद्धा गप्पा बसायला तयार नाही. राज्यातील राहिलं, आता देशातील भाषा बोलायला लागलेली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकात उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे चेहरा असतील, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. यावरून आमदार पडळकर यांनी टोला लगावला. पवारांसह विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रावरून बोलताना पडळकर म्हणाले की, शरद पवार नेहमी जे बोलतात त्याच्या उलट करतात आणि त्यांच्या कृतीतून ते दिसून येईल. 


खेडमधील सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल


दरम्यान, शिवसेना नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये कडाडून हल्ला चढवला. एकनाथ शिंदे गट, भाजप, निवडणूक आयोग तसेच मोदी सरकारचे त्यांनी वाभाडे काढले. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा त्यांनी समाचार घेतला. देशद्रोही म्हणाल, तर जीभ हासडून देऊ, असा दम त्यांनी दिला. स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नसलेली पाशवी वृत्ती जर माझा देश गिळंकृत करत असेल, तर अशा प्रवृत्तीला इथल्या इथंच गाडावं लागेल असे म्हणत त्यांनी भाजपवर घणाघात केला. ज्यांनी आमचं चिन्ह चोरलं, नाव चोरलं ते जनआशीर्वाद यात्रा काढत आहेत, जनता या चोरांना आशीर्वाद देईल का? अशी विचारणा त्यांनी विराट जनसमुदायासमोर केली. 


इतर महत्वाच्या बातम्या