सांगली : कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कदाचित एकत्र होतील, भाजपच्या लोकसभेच्या जागा वाढतील अशी परिस्थिती देशात नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते आज सांगलीत बोलत होते. राम मंदिर ह भाजपचे नाही, मतदान हे महागाईच्या मुद्यांवर होणार आहे. नरेंद्र मोदींच्या एकच निर्धाराप्रमाणे जास्तीत जास्त भाजप विरोधात उमेदवार उभे केले जातील आणि मतांची विभागणी होईल, त्यामुळे भाजपची रणनीती ओळखणे गरजेचं आहे. जर तिसऱ्यादा मोदी पंतप्रधान झाले तर देशाची घटना संपवून टाकण्याची भीती आहे, अशी टीका त्यांनी केली. 


राजीव गांधी यांनी मंदिराची कुलूप उघडली


देशातील सगळ्या संस्था हस्तगत करण्यात आल्या आहेत, त्यामुळे त्या फार काही निर्णय घेऊ शकत नाही. ज्यांनी भाजपला मते दिली ती भाजपकडे जातील अशी स्थिती नाही. राम मंदिराचा वाद आहे, पण आम्ही त्याला विरोध करणार नाही, तसा प्रश्न पण येत नाही, राजीव गांधी यांनी मंदिराची कुलूप उघडली आहेत. मंदिर उभारले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. राम मंदिर हे भाजपचे नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. 


पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतील हा असेल


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपकडे आता अन्य राज्यात पक्ष वाढण्यासारखी परिस्थिती नाही, त्यामुळे महाराष्ट्रवर भाजपचे लक्ष आहे. यातून फोडाफोडीचे प्रयोग सुरू झाले. यातील पहिला प्रयोग शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीवर झाला, हे प्रयोग करणे थांबतील असे वाटत नाही. शिवसेना फोडून भागणार नाहीं म्हणून राष्ट्रवादी फोडली. नेते हे वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेत, जनतेला ही गदारी आवडली नाही, फितुरी आवडलेली नाही. विधानसभा अध्यक्षांना आता निर्णय घ्यावा लागेल. कायद्याला धरून निर्णय असणार आहे, सोडून निर्णय झाला तर सर्वोच्च न्यायालय काय करणार? हे पहावे लागेल.  पक्षाआंतर्गत बंदी कायदा हा कुचकामी कायदा, कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावा लागेल, त्यामुळे पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतील हा असेल. 


यावेळी बोलताना चव्हाण यांनी वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबाबत विरोध नाही, वंचितने इंडिया आघाडीत यायला हवे, अशी भूमिका मांडली. विभाजन टाळण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. हे निवडणूकीचे वर्ष असल्याने निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या