Sangli News: संभाजी भिडे आणि वादग्रस्त विधान करणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात पुरोगामी संघटना 13 ऑगस्टपासून आंदोलनाची चळवळ सुरू करणार आहेत. 13 ऑगस्ट रोजी सांगलीमधील महात्मा गांधी पुतळ्यासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा करत विषारी आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी 13 ऑगस्टपासून चळवळ सुरू करण्याचा पुरोगामी नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पुरोगामी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीतल्या आंदोलनाची चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संभाजी भिडे आणि तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्याकडून थोर महापुरुषांच्या बाबतीत होणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभरातील पुरोगामी कार्यकर्त्यांची सांगलीत बैठक पार पडली. जेष्ठ विचारवंत भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. विषारी आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी 13 ऑगस्ट पासून चळवळ सुरू करण्याचा पुरोगामी नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पुरोगामी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सांगलीमध्ये पार पडली. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, युवक क्रांती दल, हमाल पंचायत, हिंद मजदूर सभा, मुस्लिम युवक संघटना, मराठा सेवा संघ, आणि संभाजी ब्रिगेड उपस्थित होते.
चळवळ सुरू करून विकृत प्रवृत्तींचा बिमोड करणार
बैठकीनंतर भारत पाटणकर म्हणाले की, जी विधाने सातत्याने झाली आहेत ती विधाने होत आहेत ती पाहता ज्या विचारांना घेऊन स्वातंत्र्यलंढा दिला गेला त्याला मातीत मिसळण्याची गोष्ट त्यांची सुरु आहे. त्यांच्या विचाराचा अर्थ या देशातील जनतेनं गोडीगुलाबीने राहू नये असा आहे. आणि पुन्हा एकदा जातीव्यवस्था, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण झाली पाहिजे. हुकूमशाही आली पाहिजे. जातीची उतरंड याठिकाणी पुन्हा एकदा प्रस्थापित झाली पाहिजे. हा विचार देशाने कधीच स्वीकारला नाही. त्यामुळे स्वातंत्र्य मिळालं आहे. जे घडलं ते चांगल्या विचारांनी घडलं आहे. हा विचार संपवल्याशिवाय कोणाची तरी हुकूमशाही प्रस्थापित होणार नाही. ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य ऑगस्ट महिन्यात मिळाले, त्यामुळे ही चळवळ या महिन्यात सुरु होईल. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातून विचार देशपातळीवर गेला आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यातून आम्ही चळवळ सुरु करून विकृत प्रवृत्तींचा बिमोड करणार आहोत. गुलामीला परत आणण्याचा हा डाव आहे. या विकृती संपवण्यासाठी महाराष्ट्रात वादळ पसरवण्यासाठी आम्ही येथून निघणार आहोत.