सांगली : सांगली लोकसभेसाठी प्रयत्न करून जागा पदरात न आल्याने कमालीचे आक्रमक झालेल्या आमदार विश्वजित कदम यांनी आज प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसमोर धुवाँधार भाषण केले. त्यांनी सांगलीची जागा काँग्रेसकडून ठाकरेंना सोडणे ही चूकच असल्याचे ठणकावून सांगितले. सांगलीमध्ये आज काँग्रेस मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना विश्वजित कदम यांनी गेल्या पाच वर्षांपासून केलेल्या प्रयत्नांचा पाढा वाचला. तसेच सर्व प्रयत्न करूनही ज्यांनी सांगली दिष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला. विश्वजित कदम यांनी केलेल्या आक्रमक भाषणानंतर बाळासाहेब थोरात यांनी जागावाटपावरून काय काय घडलं? याचा घटनाक्रम सांगितला.


सांगलीच्या जागेसाठी सर्वांचा दबाव


थोरात म्हणाले की, जागावाटपामद्ये तीन पक्ष एकत्र असल्याने तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचा विषय होता. या जागावाटपामध्ये 30 जागा सहज गेल्या आणि 18 जागांमध्ये गुंता होत गेला. त्यानंतर कमी कमी होत फक्त तीन जागांसाठी तीन महिने गेले. अडलेल्या जागांसाठी रात्री बारापर्यंत चर्चाच सुरु होती. ते पुढे म्हणाले की, 2019 मध्ये त्यांचे (शिवसेना ठाकरे गट) त्यांचे सर्वाधिक खासदार निवडून आले होते. त्यामुळे एका एका जागेसाठी चर्चा झाली. तीन चार जागांसाठी, तर अत्यंत घासून चर्चा झाली. बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोल्हापूर सोडले, सांगली पाहिजे असा सूर मित्रपक्षांकडून झाला. मात्र, सांगलीच्या जागेसाठी सर्वांचा दबाव होता. 


राहुल आणि सोनिया गांधी यांना सुद्धा जाणीव


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना सुद्धा सांगलीच्या जागेवरून झालेल्या त्रासाची जाणीव आहे. तेच सांगलील सांगलीने सर्वाधिक त्रास दिला. मात्र, आघाडीचा धर्म पळाला पाहिजे. भाजपला हद्दपार करण्यासाठी आपण सर्व ताकतीने एकत्र यायला पाहिजे, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले. 


रात्री एक वाजताना झोपताना सुद्धा बाळासाहेबांचा (विश्वजित कदम) फोन येत होता. काय केलं तुम्ही? दिल्लीवाले विचारू लागले होते काय केलं तुम्ही सांगलीच्या जागेवर असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. वेणुगोपाल स्वत: मुंबईला आले होते. आमच्याकडून विशाल पाटलांना सगळ्या ऑफर दिल्या गेल्या, सर्वांना ही परिस्थिती माहीत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या