सांगली : सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्नांची शर्थ करूनही निराशा हाती आलेल्या आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेस मेळाव्यातून भूमिका स्पष्ट केली. गेल्या पाच वर्षांपासून अनेक आक्रमणे आमच्यावर झाली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे आम्ही टिकून राहिलो. जिल्ह्यात 200 किलोमीटर आम्ही जनसंवाद पदयात्रा काढली. काँगेसची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे हा आग्रह होता. आमच्यात गटबाजी होती, पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्णविराम दिला. एकच काँगेस पक्ष हा एकच गट आहे. मलाही सतत लोकसभा लढवण्याचे आवाहन करण्यात आले.2019 मध्ये मी विधानसभा लढवण्यावर ठाम राहिलो. कारण पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे नव्हते. एका तरुण सहकाऱ्याला तयार करून मी लोकसभेसाठी एकजण तयार केले, नाव देखील लोकसभेसाठी पाठवल्याचे ते म्हणाले. 



विश्वजित कदम म्हणाले की, सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असे सांगितले होते. आम्ही लोकांना सांगत गेलो की यंदा काँग्रेसचा खासदार असेल.  जागावाटपाची चर्चा सुरू झाल्यानंतर सांगली आणि कोल्हापूरचा संबंध कुठे आला? शाहू महाराज ज्या पक्षाकडून लढतील त्यावर ते लढतील असे ठरले होते. मग सांगलीवर कसा काय हक्क सांगितला? उद्धव ठाकरे सांगलीत आले आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. असं लोकशाहीत होतं का? जागा देऊन चूक केलीच, कोण काय करत होते, याकडे का लक्ष दिलं नाही? अशी थेट विचारणाच विश्वजित कदम यांनी केली. 


तत्पूर्वी ते म्हणाले की, वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर करून लोकशाही संपण्याचा प्रयत्न सुद्धा या सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी केला. जनतेनं निवडून आलेले आमदार आहेत, पक्ष आहेत ते महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून या महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकारणाला गालबोट लागेल अशा पद्धतीचा सुद्धा अत्यंत चुकीचा आणि वाईट कृत्य करण्याचं काम हे गेल्या पाच वर्षांमध्ये आपण पाहिलं. 


आंबेडकरांना सुद्धा स्वर्गामध्ये वाईट वाटत असेल 


त्यांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणारे महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील ज्यांनी संविधान लिहिलं, लोकशाही या देशाची बळकट केली असे परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा स्वर्गामध्ये वाईट वाटत असेल, की देशामध्ये काय चाललंय, त्या महाराष्ट्रात काय चाललं आहे? 


पण लोकसभेमध्ये आम्ही दुसऱ्या पक्षांचे ऐकणार नाही 


मोठ्या आशेनं राहुलजी गांधी आमचे नेते कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत साडेतीन हजार किलोमीटर पायी चालत लोकांच्या भावना शेतकऱ्यांच्या, माता भगिनींच्या तरुण पिढींच्या सर्व थरातील आमच्या लोकांच्या जनतेच्या भावना समजून घेऊन पायी चालत होते. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून ज्या गांधी कुटुंबाने या देशासाठी त्याग दिला, बलिदान केलं अशा ही गांधी कुटुंबातील सदस्यांना पायी चालत घेऊन सखोल चौकशी केली. विरोधी पक्षातील खासदार एकशे दीडशे खासदार आम्ही सस्पेंड करू, पण लोकसभेमध्ये आम्ही दुसऱ्या पक्षांचे ऐकणार नाही हे सुद्धा दुर्दैवाने आज पाहत आहोत.  


सांगली जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी तळातील स्वातंत्र्यलढ्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानून स्वातंत्र्यलढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं. सांगली जिल्ह्याची ही भूमी ही स्वातंत्र्यसैनिकांची लढावू भूमी आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेली देवराष्ट्र गाव हे माझ्या मतदारसंघात आहे. स्वर्गीय वसंतदादा यांची जन्मभूमी कर्मभूमी आणि तदनंतर काँग्रेस पक्षाच्या विचारातून ज्यांनी सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये काम केलं ते पतंगराव कदम, स्वर्गीय आर. आर. पाटील, स्वर्गीय राजारामबापू असतील. असे थोर हुतात्मे व्यक्ति आहेत ज्यांनी ज्यांनी सांगलीच्या मातीतून जनतेचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात मोठे योगदान दिलं. 


इतर महत्वाच्या बातम्या