Sangli News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Mla Gopichand Padalkar) यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांच्यासह शेकडोच्या जमावाने मिरजेत मध्यरात्री 4 जेसीबीने अमर थिएटरसमोर 10 दुकाने जमीनदोस्त केल्याने संतापाचा कडेलोट झाला आहे. मिरजेत (Miraj) इमारती, गाळे पाडल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनाकडून मिरज शहर बंदचा इशारा देण्यात आला आहे. एमआयएम नेते महेश कुमार कांबळे यांच्याकडून सर्वपक्षीय शहर बंदचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, बेकायदेशीर बांधकाम पाडल्या प्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नेमका काय प्रकार घडला?


मिरजमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरुन दोन गटात वाद झाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी अतिक्रमण पाडल्याने वाद निर्माण झाला आहे. वादग्रस्त जागेचा निकाल ब्रह्मानंद पडळकर यांच्या बाजूने लागला आहे. महापालिकेने नोटीस दिल्याने हे अतिक्रमण हटवल्याचा दावा ब्रह्मानंद पडळकरांनी केला आहे. अतिक्रमण हटवण्याला गाळ्यातील भाडेकरुंनी विरोध केला आहे. यावेळी दोन गटात राडा झाला. जागेचा ताबा घेण्यासाठी गाळे पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला.


जेसीबीने हॉटेल, दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर त्या गाळ्यामधील भाडेकरुंनी या घटनेला विरोध केला. जागेचा ताबा घेण्यासाठी गाळे पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज रोडवर बसस्थानकाशेजारी घडली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार दुकाने पाडल्यानंतर पडळकर समर्थकांनी मागील बाजूस असलेल्या झोपडपट्टीला सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. तथापि, झोपडपट्टीधारकांनी पडळकर समर्थकांवर जोरदार दगडफेक केली. तसेच जेसीबी आणि पडळकर समर्थकांच्या गाड्यांची तोडफोड केली. 


गाळेधारक आक्रमक, जेसीबीच्या काचा फोडल्या 


जेसीबीच्या काचांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांनी ही जागा घेतल्याचा दावा केला जात आहे. या जागेचा निकाल ब्रह्मानंद पडळकर यांच्या बाजूने लागल्याचे (10 shops demolished in by 4 JCB in Miraj) म्हटले जात आहे. याबाबत महापालिकेने अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली होती. त्यानंतर हे गाळे पाडण्यात आले आहेत. पाडापाडी सुरु असताना गाळेधारक मात्र चांगलेच संतप्त झाले. गाळेधारकांनी पाडापाडी करण्यास विरोध केला. यातून दोन गटात वाद झाला. यामध्ये गाळेधारकांनी जेसीबीच्या काचा फोडल्या. याप्रकरणी गाळेधारक मिरज पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या