Sangli News : सांगलीत महापालिकेकडून (Sangli Municipal Corporation) गोवर रुबेला (Measles Rubella) प्रतिबंधक उपाययोजनासाठी 9 पथके तैनात करण्यात आली आहेत. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 9  महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. सांगलीत वॉर्ड 9 मध्ये गोवरचे 2 आणि वॉर्ड 1 मध्ये गोवर 1 तर वॉर्ड 5 मध्ये रुबेलाचा एक रुग्ण आढळून आला आहे. यामध्ये 9 वर्षाचे बालक तसेच 24 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. तर 8 महिने 28 दिवसाच्या बालकाला रुबेलाची बाधा झाली आहे.


या सर्वाना ताप आणि अंगावर पुरळ आढळून आल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, हे सर्व चार जण ठीक असून त्यांना कोणताही त्रास नसल्याचे मनपा (Sangli Municipal Corporation) नोडल अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले. 


ज्या भागात हे रुग्ण सापडले आहेत, त्या भागातील 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे करून त्यांचे लसीकरण करणेसाठी 9 पथक, 4 अधिकारी, नर्सेस 9, आशा वर्कर 27 असा स्टाफ सर्व्हेसाठी काम करीत आहे. तरीही ज्या बालकांना मागील तीन महिन्यात ताप अथवा पुरळ आला असेल तर व्हिटॅमिन ए डोस सुरू केला जाणार आहे. ज्या बालकांना ताप आणि पुरळचे लक्षणे आहेत त्यांनी नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी तसेच ज्या बालकांचे गोवरचे पहिले आणि दुसरे लसीकरण झाले नाही त्यांनीही लसीकरण करून घ्यावे. (Sangli Municipal Corporation)


दरम्यान शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 2 किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास तो गोवरचा उद्रेक समजून (Measles Rubella) वॉर्ड 9 मध्ये 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना अतिरिक्त डोस देण्यात येणार आहे. अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.वैभव पाटील यांनी दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या