Anita Birje Eknath Shinde ठाणे: ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या काळापासून ठाकरेंसोबत असलेल्या अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत काल (10 ऑगस्ट रोजी) शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ठाण्यात असतानाच अनिता बिर्जे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अनिता बिर्जे (Anita Birje) यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 


शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिता बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वात आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. 


अनिता बिर्जेंनी ठाकरे गटाची साथ का सोडली?


एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश केल्यानंतर अनिता बिर्जे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  राजकारणासाठी नाही तर समाज सेवेसाठी मी हा प्रवेश करत असल्याच्या अनिता बिर्जे यांनी सांगितले. ते लोकही माझेच आहेत. मी आधीच सांगितलेलं होतं की एकनाथ शिंदे यांनी राजन विचार एकत्र आले पाहिजे आणि भविष्यात ते घडणार, असंही अनिता बिर्जे म्हणाल्या. माझा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझा या भावाचा उपयोग तळागाळातील सर्व महिलांना झाला पाहिजे, असं अनिता बिर्जेंनी सांगितले.


अनिता बिर्जे ठाणे महिला आघाडी प्रमुख-


शिवसेनेत फूट पडल्यानंतर देखील अनिता बिर्जे या उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत्या. मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यामुळे हा ठाण्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय. अनिता बिर्जे या ठाकरे गटाच्या ठाणे महिला आघाडी प्रमुख होत्या. मात्र, आता त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असून वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतली आहे. 


ठाण्यातील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल 


ठाणे उभं राहिलं ते शिवसैनिकांचा प्रेम आहे. शिवसैनिकांनी मेहनत घेतली नसती तर मिंधेंची दाढी उगवली नसती. संजयने उत्तम भाषण केलं आहे. आता उत्सुकता नमक हराम 2 ची आहे. समोर दिसतोय पण तो जगाला दाखवायचा आहे. नागाची उमपा तुम्ही दिली पण मला नागाचा अपमान करायचा नाही. हे मांडूळ आहे. हे सरपटणारे प्राणी आहे. हे मोदींसमोर वळवळणारे म्हांडूळ आहे. रोज घालीन लोटांगण सुरु आहे", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते ठाण्यातील मेळाव्यात बोलत होते. 


संबंधित व्हिडीओ-