Samruddhi Mahamarg Accident : शहापूर तालुक्यातील कासगाव परिसरात समृद्धी महामार्गावर दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी जीव रक्षक पथक घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केले. ट्रकमधील मयत चालक व क्लिनर यांचा मृतदेह जीवरक्षक पथकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Continues below advertisement

ट्रक चालकाला झोप लागल्याने घडला अपघात; ट्रक चालकसह क्लिनरचा जागीच मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला एक ट्रक बंद पडल्याने तो उभा होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकाला अचानक झोप लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. दरम्यान धडक देणाऱ्या ट्रकमधील लोखंडी एंगल ट्रकच्या पुढील भागात शिरले, ज्यामुळे ट्रक मधील चालक व क्लीनर दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. रात्रीच्या प्रवासादरम्यान डुलकी लागल्याने हा अपघात घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केले आहे. घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने ती सुरळीत केली. सध्या या घटनेचा तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

नेत्र तपासणीला जाणाऱ्या दाम्पत्यावर काळाची झडप

नागपूर शहरात देखील असाच एक भीषण अपघात झाला आहे. यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाने धडक दिल्याने पन्नास वर्षीय पती राजकुमार कुंभारे व सतेचाळीस पत्नी इंदू कुंभारे यांचा मृत्यू झाला. घटना सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेलकामठी शिवारात घडली. अरुंद रस्ता व वळणावर चारचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर चारचाकी वाहन देखील उलटले असून यात वाहनाचे ही मोठे नुकसान झाले आहे.

Continues below advertisement

उभ्या एसटी बसवर दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू

पाळीव जनावरांचा कळप जात असल्यानं एसटी महामंडळाच्या चालकानं बस रस्त्याच्या बाजूला थांबविली होती. याचंवेळी भरधाव आलेल्या दुचाकी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं दुचाकी बसवर अदळली. यात दुचाकी चालक तरुण गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या पालांदुर मार्गावरील गोंडेगाव इथं घडली. पालांदुर येथील आशिष गोंडाने (37) असं या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नावं आहे. या प्रकरणी पालांदुर पोलीस अधिक तपास करीत आहे.

ही बातमी वाचा: