Continues below advertisement


Horoscope Today 9 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 9 सप्टेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा हा दिवस असून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


मेष राशीच्या लोकांनो आज कोर्टकचेऱ्या ज्यांच्या मागे आहेत, त्यांना समाधानकारक परिणाम अनुभवास न आल्यामुळे वैतागून जाल


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


वृषभ राशीच्या लोकांनो आज दीर्घकालीन रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल, घरातील मोठ्या व्यक्तींशी पटणार नाही


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


मिथुन राशीच्या लोकांनो आज मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल, बौद्धिक पेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळेल


कर्क रास (Cancer Horoscope Today)


कर्क राशीच्या लोकांनो आज थोड्या एकलकोंड्या स्वभावामुळे मनावरचा ताण अजून वाढवून घ्याल


सिंह रास (Leo Horoscope Today)


सिंह राशीच्या लोकांनो आज महिला थोड्या चिडखोर अस्थिर बनतील. नोकरी व्यवसायात कल्पनाशक्तीच्या भराऱ्या जास्त मारता येणार नाहीत


कन्या रास (Virgo Horoscope Today)


कन्या राशीच्या लोकांनो आज प्रत्येक क्षणाला घरात आणि घराबाहेर आपली भूमिका नेमकी ओळखून त्याचे पालन केले तर सुसह्य होईल


तूळ रास (Libra Horoscope Today)


तूळ राशीच्या लोकांनो आज अपेक्षित संधी न मिळाल्यामुळे संभ्रमात पडाल, परंतु यश निश्चित मिळेल


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


वृश्चिक राशीच्या लोकांनो आज काळजीकरता आत्मविश्वासाने पावले टाका, एकटे राहण्यापेक्षा जास्तीत जास्त माणसांच्या गोतावळ्यात रहा


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


धनु राशीच्या लोकांनो आज आर्थिक अडचणी जाणवतील, परंतु हे ग्रहमान तात्पुरते आहे काळजी करू नये


मकर रास (Capricorn Horoscope Today)


मकर राशीच्या लोकांनो आज अवाजवी हट्टीपणा सोडून द्यावा लागेल, तारतम्याने विचार करून पावले टाकावी


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कुंभ राशीच्या लोकांनो आज महिला मेहनती आणि कष्टाळू बनतील, मानापमानाच्या कल्पना जरा जास्तच टोकदार बनल्यामुळे थोडे मनाप्रमाणे वागाल


मीन रास (Pisces Horoscope Today)


मीन राशीच्या लोकांनो आज पूर्वी ज्या गोष्टींपासून वंचित झाला होतात, त्या गोष्टी मिळण्याकडे कल राहील.


हेही वाचा :           


Lucky Zodiac Signs: 9 सप्टेंबरला ट्रिपल 9 चा महासंयोग! 'या' 5 राशींचं नशीब फळफळणार, मंगळाची चौपट शक्ती करणार मालामाल..


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)